डॉक्टर मित्राने रचला कट, मौलानाने केली रेकी; अमरावती हत्याकांडातील ‘ही’ आहेत 7 पात्रं

मुंबई तक

03 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

अमरावती: अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट अन्य कोणी रचला नसून त्यांचा पशुवैद्यकीय डॉक्टर मित्र युसूफ खान यानेच रचला होता. उमेशचा भाऊ महेश याने याबाबत खुलासा केला आहे की, आरोपी युसूफ खान उर्फ ​​बहादूर खान हा त्याच्या भावाचा खूप जवळचा मित्र होता. उमेशने युसूफला अनेकदा मदत केली होती. तो युसूफला वेळोवेळी कर्जही देत […]

Mumbaitak
follow google news

अमरावती: अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट अन्य कोणी रचला नसून त्यांचा पशुवैद्यकीय डॉक्टर मित्र युसूफ खान यानेच रचला होता. उमेशचा भाऊ महेश याने याबाबत खुलासा केला आहे की, आरोपी युसूफ खान उर्फ ​​बहादूर खान हा त्याच्या भावाचा खूप जवळचा मित्र होता.

हे वाचलं का?

उमेशने युसूफला अनेकदा मदत केली होती. तो युसूफला वेळोवेळी कर्जही देत ​​असे. उमेशने युसूफच्या बहिणीच्या लग्नात आणि मुलाच्या अॅडमिशनसाठीही मदत केली होती. इतके चांगले संबंध असतानाही त्याने उमेशच्या हत्येचा कट रचला. खुनाच्या इतर आरोपींमध्ये काही मौलाना, काही एनजीओ ऑपरेटर तर काही रोजंदारी मजूरी करत आहेत.

युसूफ व्हायरल मेसेजवर ठेवायचा लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे यांच्या हत्येतील प्रत्येक आरोपीने वेगवेगळे कट रचले होते. या हत्येमध्ये सहभागी असलेले डॉक्टर युसूफ खान हे केवळ उच्चशिक्षितच नाही तर सर्वात वयस्कर देखील आहेत. त्याचे काम व्हायरल मेसेजवर लक्ष ठेवण्याचे होते.

नुपूर शर्मा यांना सपोर्ट करणाऱ्या उमेश कोल्हेंचा व्हॉट्सअॅप मेसेज युसूफने पहिल्यांदा पाहिला होता, कारण उमेशने चुकून तो मेसेज एका ग्रुपमध्ये शेअर केला होता ज्याचा अॅडमिन युसूफ होता. हा मेसेज युसूफने आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि उमेशविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करून इतर लोकांना भडकवले, असा आरोप आहे.

इरफानने हत्येचा प्लॅन बनवला, टीम तयार केली

कट रचणाऱ्या डॉक्टरने उमेशच्या विरोधात वातावरण निर्माण केल्यावर एनजीओचा मास्टरमाईंड शेख इरफान याने त्यांच्या हत्येचा कट रचण्याची योजना तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी या कटात सर्वप्रथम मौलाना मुदस्सीर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम याची निवड करून उमेश कोल्हे यांच्यावर रेकी करण्याची जबाबदारी सोपवली.

यानंतर इरफानने 25 वर्षीय शाहरुख पठाण, 24 वर्षीय अब्दुल तौफिक, 22 वर्षीय शोएब खान उर्फ ​​भुरिया आणि 22 वर्षीय अतीब रशीद यांचा या कटात समावेश केला. संपूर्ण कट रचल्यानंतर 21 जूनच्या रात्री शाहरुख आणि आतीबने उमेश यांच्या गळ्यात खंजीर खुपसला, असा आरोप आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यापैकी कोणाचाही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे आढळून आले आहे.

घटना समोर येण्यापूर्वीचा व्हिडिओ

हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना घटनेपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. व्हिडिओमध्ये काळे कपडे घातलेले तीन आरोपी रेकी करताना दिसत आहेत. दुसर्‍या फुटेजमध्ये तिन्ही आरोपी खून करण्यासाठी घटनास्थळाकडे जाताना दिसत आहेत.

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत

अमरावती हत्याकांडात पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्व उपस्थीत केले जात आहेत. महाराष्ट्र एटीएस आधीच दहशतवादी अँगलने या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला दरोड्यासाठी खून केला म्हणून संबोधले आणि नुपूरच्या समर्थनार्थ पोस्ट करण्याचे कारण लपवले असा आरोप आहे.

प्रकरणाचे गांभीर्य पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आणि पथकाने अमरावती गाठून एफआयआर नोंदवला. एफआयआरमध्ये मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान, शाहिम अहमद आणि इरफान खान यांच्यासह इतरांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत.

    follow whatsapp