ADVERTISEMENT
रस्त्याने जात असताना स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
कट मारल्याच्या रागातून स्कुटी चालकासह त्याच्या 10 ते 15 साथीदारांनी रिक्षा चालकाला जाब विचारत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अमोल केदारे, सिद्धार्थ मोरेसह इतर 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
झालं असं की, रिक्षाचालक राजेश भालेराव रस्त्यावरून जात असताना स्कुटी चालक सिद्धार्थ मोरे सोबत वाद झाला.
त्यानंतर राजेश भालेराव हे आपली रिक्षा घेऊन इंदिरा चौकात आले होते.
यावेळी अमोल केदारे, सिद्धार्थ मोरे आणि इतर 10 ते 15 लोक इंदिरा चौकात असलेल्या रिक्षा स्टँडवर आले आणि त्यांनी रिक्षाचालकासह दोघांना मारहाण केली.
स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून रिक्षाचालक राजेश भालेराव यांच्यासह एका जणांला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली.
इंदिरा चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात सुरूवातील दोन जण रिक्षाचालकावर हल्ला करतात. त्यानंतर रस्त्याच्या कडेला मारहाण करताना दिसत आहे.
सीसीटीव्हीच्या साहाय्याने डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालकाला केलेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी स्कुटी चालकाला अटक केली असून, पुढील तपास केला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
ADVERTISEMENT