कर्जबुडव्या Mehul Choksi ला डोमिनिका कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

मुंबई तक

• 12:57 PM • 14 Jul 2021

Mehul Choksi ला डोमनिका कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मेहुल चोक्सीची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे त्याला प्रकृतीच्या अस्वस्थ असल्याच्या कारणामुळे जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वालाही जाता येणार आहे. मेहुल चोक्सीचे वकील ज्युलियन प्रोव्होस्ट यांनी सांगितलं की मेहुल चोक्सीची तब्बेत बिघडली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सहमतीने कोर्टाने प्रकृतीच्या कारणामुळे मेहुल चोक्सीला जामीन […]

Mumbaitak
follow google news

Mehul Choksi ला डोमनिका कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मेहुल चोक्सीची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे त्याला प्रकृतीच्या अस्वस्थ असल्याच्या कारणामुळे जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वालाही जाता येणार आहे. मेहुल चोक्सीचे वकील ज्युलियन प्रोव्होस्ट यांनी सांगितलं की मेहुल चोक्सीची तब्बेत बिघडली आहे त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सहमतीने कोर्टाने प्रकृतीच्या कारणामुळे मेहुल चोक्सीला जामीन मंजूर केला आहे.

हे वाचलं का?

10 हजार इस्टर्न कॅरेबियन डॉलरच्या जात मुचलक्यावर मेहुल चोक्सीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मेहुलला कोर्टात अँटिग्वा या ठिकाणी असलेले त्याचे डॉक्टर आणि त्याच्यावर करण्यात येणारे उपचार या सगळ्याची माहिती मेहुल चोक्सीला कोर्टाला कळवावी लागणार आहे. 24 मे 2021 ला मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली होती. डोमनिकात अटक करण्यात आलेल्या मेहुल चोक्सीला जवळपास सव्वा महिन्याने जामीन मिळाला आहे.

काय आहे प्रकरण?

भारतातल्या पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले होते. 2018 मध्ये हे दोघे फरार झाले. त्यानंतर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. मात्र मेहुल चोक्सी हा अँटीग्वा मध्ये लपला होता. 24 मे रोजी तो डोमनिकाला आला तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावला आहे. या दोघांनीही बँकेच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने बँकेकडून वारंवार पैसे उचलले आणि ते परत केलेच नाहीत. या प्रकरणाचा कोणाताही लेखाजोखा नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. मात्र भारतात या प्रकरणावरून गदारोळ होण्यापूर्वीच मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांनीही देश सोडला होता.

२०१७ मध्या मेहुल चोक्सीला अँटीग्वाचं नागरिकत्व देण्यात आलं होतं. परंतू त्यासाठी चोक्सीने आपलं भारतीय नागरिकत्व सोडण्याची कोणतीही कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण केली नाही. त्यामुळे चोक्सी हा अजुनही भारताचाच नागरिक आहे. त्यामुळे डोमनिका कोर्टासमोर भारतीय तपासयंत्रणांची बाजू बळकट व्हावी यासाठी सीबीआय, ईडी या यंत्रणा काम करत आहेत अशात आता मेहुल चोक्सीची प्रकृती बरी नसल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    follow whatsapp