अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे
ADVERTISEMENT
रविवारी रात्री झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे.
याबद्दल अभिनेत्री निवेदिता सराफ ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विलेपार्ले येथून घरी परतत असताना रात्री १०. ३० च्या सुमारास जेव्हीपीडी जंकशन सिग्नल लागल्यावर रस्त्यावर थांबलो असता, मागून संबंधित सेडान चालकाने धडक दिली
मागील गाडीने धडक दिल्यानंतर माझे ड्राइवर अजय ठाकूर यांनी गाडीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी गाडीबाहेर आले त्यावेळी सेडान चालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनतर माझ्या ड्रायव्हरला मारहाण करून त्याने गाडीकडे येत काचेला धडक देत मला काच खाली घेण्यास सांगितली.
समोरील व्यक्ती काहीशी घाबरल्याचे लक्षात येताच माझ्या ड्रायव्हरने पोलिसांना बोलावतो असे सांगताच सेडान चालक तातडीने निघून गेला. मात्र तिथून पळ काढताना त्याच्यासमोर बेस्ट बस आडवी आली . यावेळी बेस्ट बस ड्राइव्हर लाही शिवीगाळ करून तो पुढे निघून गेला,’ अशी माहिती निवेदिता सराफ ह्यांनी दिली .हेच त्यांनी जुहू पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे
निवेदिता सराफ ह्यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांक MH-15-BD-9945 असा असून त्यांच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती निवेदिता सराफ ह्यांना जुहू पोलिसांकडून अद्यापपर्यंत मिळाली आहे.
निवेदिता सराफ या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशोक सराफ यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्या नाटक आणि सीरियल्समधूनही काम करतात. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या भूमिकेत त्यांनी आसावरी ही भूमिका साकारली होती. लवकरच कलर्स मराठीवर त्यांची भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
ADVERTISEMENT