महाराष्ट्रात कोकणकिनारपट्टीवर धडकलेल्या तौकताई चक्रीवादळाचा फटका इतर भागांमध्ये बसायला सुरुवात झाली आहे. मुंबईतही आज ढगाळ वातावरण असून काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाने दिलेली सूचना लक्षात घेऊन महापालिकेने सोमवारी शहरातलं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
महापालिका आयुक्ता इक्बालसिंग चहल यांनी याविषयीची माहिती दिली. १८ ते २० मे या कालावधीत आता शहरात पुढचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती महापालिकेने दिली. गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये लसीचा पहिला आणि दुसरा डोस कधी घ्यायचा याबद्दलही अनेक शंका होत्या. महापालिका आयुक्त चहल यांनी याविषयीही माहिती दिली आहे.
१) कोविशिल्ड लसीच्या पहिल्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स हेच कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. इतरांसाठीचं लसीकरण सध्या बंद असणार आहे.
२) १८ ते २० मे या कालावधित कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना Walk in Facility मार्फत लस मिळेल.
३) याआधी लसीकरणाबद्दल महापालिकेने जे नियम आखून दिले आहेत, तेच नियम या काळात कायम राहणार आहेत.
ADVERTISEMENT