Rajasthan crime news : गेल्या महिन्यात दिल्लीतील (Sharddha Walker Murder Case) श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणासारखी घटना राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात (Rajasthan Nagaur District ) समोर आली होती. येथे एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीला आधी मंदिरात नेले आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर त्याने तिचे अनेक तुकडे देखील केले होते. आतापर्यंत केवळ महिलेचे कपडे, केस आणि जबडा जप्त करण्यात आला आहे. या घटनेला 25 दिवस उलटून गेले तरी अद्याप मृतदेह हाती लागलेला नाही. आरोपी सतत दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. Police say that the accused is constantly misleading.
ADVERTISEMENT
सासरी जात असल्याचे सांगून महिला निघून गेली होती
नागौर जिल्ह्यातील श्री बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालासर गावातील विवाहित महिला 20 जानेवारी रोजी तिच्या प्रियकरासह सासरी जाऊ असे सांगून माहेरहून निघून गेली होती. ती सासरच्या घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यादरम्यान तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. यानंतर 22 जानेवारी रोजी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
Rebika Murder: हत्येनंतर मृतदेहाचे केले 19 तुकडे, सासूनेच दिली कटाची सुपारी
झुडपात कपडे, केस आणि जबडा सापडला
28 जानेवारी रोजी नागौर शहरातील माळवा रोडवर असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या पाठीमागील झुडपात तिचे कपडे, केस आणि जबडा आढळून आला होता. याबाबत पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाइकांनी तिची ओळख पटवली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्रियकराची धक्कादायक कबुली
संशयाच्या आधारे पोलिसांनी तिचा प्रियकर अनोपरम याला अटक केली. गुड्डीला तिच्या नातेवाईकाने अनोपरामसोबत माळवा रोडवरील हाऊसिंग बोर्डाजवळ मोटरसायकलवर बसलेले पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली. त्याने सांगितले की, “मी गुड्डीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे डेरवा गावातील विहिरीत फेकून दिले.”
यावर एसडीआरएफ आणि एनडीआरएफने डेरवा गावातील विहिरीत 3 दिवस शोधमोहीम राबवली मात्र यश मिळाले नाही. यानंतर आरोपीने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्याचे पोलिसांना सांगितले. यावर त्याने गुड्डीसह कुचेरा पोलीस स्टेशन हद्दीतील बुटी धाम गाठले. तेथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दोघेही नागौरला पोहोचले होते. मग तिला त्याने ठार मारले.
Shraddha Walker : चेहरा जाळला, हाडांची पावडर केली; श्रद्धाच्या खुनाची भयावह कहाणी
आता आरोपींची नार्को टेस्ट होणार आहे
नागौर पोलिसांनी आरोपीला 15 दिवसांच्या रिमांडवर घेऊन चौकशी केली मात्र त्याने सत्य सांगितले नाही. त्यानंतर पोलिसांनी गुड्डीच्या कुटुंबीयांचे नमुने घेऊन जप्त केलेल्या जबड्याच्या हाडाची डीएनए चाचणी केली, जी जुळली. नागौरचे पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितले की, आरोपीने आपण खून केल्याचे मान्य केले आहे, परंतु आरोपी सतत दिशाभूल करत आहे. आता आरोपींची नार्को टेस्ट होणार आहे.
ADVERTISEMENT