जम्मू-काश्मीरसह दिल्लीला भूकंपाचे तीव्र धक्के, रिश्टर स्केलवरची तीव्रता 5.7

मुंबई तक

• 06:03 AM • 05 Feb 2022

जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. य़ा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. काश्मीरच्या काश्मीर खोरं आणि जम्मूतल्या काही भागात तीव्र धक्के बसले आहेत. त्यानंतर लोक घराबाहेर आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जमीन खूप मोठ्या प्रमाणावर हादरताना त्यांनी पाहिली. त्यामुळे बरेच लोक घाबरलेही होते. याआधी 14 जानेवारीलाही अशाच प्रकारे भूकंपाचे […]

Mumbaitak
follow google news

जम्मू काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. य़ा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. काश्मीरच्या काश्मीर खोरं आणि जम्मूतल्या काही भागात तीव्र धक्के बसले आहेत. त्यानंतर लोक घराबाहेर आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जमीन खूप मोठ्या प्रमाणावर हादरताना त्यांनी पाहिली. त्यामुळे बरेच लोक घाबरलेही होते. याआधी 14 जानेवारीलाही अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के बसले होते. आजच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी ९.४५ च्या सुमारास हे धक्के बसले.

हे वाचलं का?

अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या पश्चिमेला शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या परिणामी जम्मू-काश्मीर आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसले.

भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.

    follow whatsapp