Porn Case : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरण बाहेर काढलं होतं. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटकही झाली होती आणि नंतर जामीनही मिळाला होता. आता. या प्रकरणी आता ईडीची एंट्री झाली आहे. राज कुंद्राच्या विरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत राज कुंद्रा पॉर्न प्रकरणामुळे अडचणीत आला होता. तसंच त्या सगळ्या प्रकरणाची चर्चाही झाली होती. आता मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. राज कुंद्राच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
२०२१ मध्ये राज कुंद्राला मुंबईच्या क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. राज कुंद्रावर हा आरोप आहे की फेब्रुवारी २०१९ कुंद्रान आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर हॉटशॉट नावाचं App विकसित केलं. हे हॉटशॉट अॅप राज कुंद्राने यु. के. स्थित फर्मला २५ हजार डॉलर्समध्ये विकलं होतं. या कंपनीचा सीईओ प्रदीप बक्षी हा राज कुंद्राचा मेहुणा आहे.
राज कुंद्रा, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बॉम्बे हायकोर्टाने फेटाळला
राज कुंद्रानं हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी केनरिन नावाच्या कंपनीनं कुंद्राच्या कंपनी विहानशी करार केला होता आणि त्याच देखभालीसाठी विहान कंपनीच्या बँक खात्यात पैशांचा व्यवहार झाल्याचंही तपासात उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्लिकेशन पॉर्न कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. या अर्जामागे राज कुंद्राचा हात होता आणि त्यानं आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्लॅन बी तयार केला होता.
काय आहे प्रकरण?
राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये ‘आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे.
त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे. या प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला आहे. आता पु्हा एकदा राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT