अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप; ईडीने नोंदवला डीसीपी श्रीरामे यांचा जबाब

दिव्येश सिंह

• 02:07 AM • 17 Dec 2021

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशात अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब आज ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अशात अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात डीसीपी राहुल श्रीरामे यांचा जबाब आज ईडीने नोंदवला आहे. राहुल श्रीरामे हे पुणे वाहतूक विभागाचे डीसीपी म्हणून काम करतात. त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स धाडलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब आता नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ईडीच्या सूत्रांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात बदल्यांमध्ये फेरफार आणि ढवळाढवळ यासंबंधीचाही गुन्हा आहे. या प्रकरणात श्रीरामे यांची चौकशी आज करण्यात आली. येत्या काळात आणखी काही डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.

याच प्रकरणात ईडीने आयपीएस अधिकारी जी श्रीधर यांना समन्स बजावलं आहे. अकोला या ठिकाणी ते पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात. त्यांनाही याच प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. 7 डिसेंबरला महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे हेदेखील ईडीसमोर हजर झाले होते. 30 नोव्हेंबरला ते महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

याआधी ईडीने या प्रकरणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचाही जबाब नोंदवला होता. तसंच डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आणि उपसचिव कैलास गायकवाड यांचीही चौकशी केली होती. त्यांचेही जबाबही या प्रकरणी नोंदवण्यात आले. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कुंटे म्हणाले की, अनिल देशमुख प्रकरणाच्या संदर्भात ईडीने आपल्याला काही माहिती घेण्यासाठी बोलावले होते आणि त्यांनी ती दिली आहे.

अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100 कोटी खंडणीचं टार्गेट दिलं नव्हतं, पैसेही घेतले नाहीत-सचिन वाझे

ED या प्रकरणात ट्रान्सफर पोस्टिंगशी संबंधित लाच प्रकरणाकडे देखील लक्ष देत आहे आणि एजन्सीच्या अधिकार्‍यांनी याच मुद्द्याशी संबंधित अनेक व्यक्तींची चौकशी केली आहे. बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझेने ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलीस उपायुक्त दर्जाच्या 10 अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 20 कोटी रुपये घेतले होते. आता याप्रकरणीच महाराष्ट्र पोलीस डीसीपी राहुल श्रीरामे यांची चौकशी करण्यात आली असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

    follow whatsapp