कोश्यारी हे राज्यपाल नसून ‘भाजप’पाल, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची: नाना पटोले

मुंबई तक

• 02:05 PM • 15 Mar 2022

मुंबई: ‘विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीनही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या.’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पाहा नाना पटोले नेमकं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ‘विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीनही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या.’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हे वाचलं का?

पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले:

विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणुक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही.’

‘आघाडीतील तीनही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे, एकदा का निवडणुक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू.’ असे पटोले म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने आवाजी मतदान घेण्याचं निर्णय हा मागील अधिवेशनातच घेतला होता. मात्र, राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नव्हती.

विधानसभा अध्यक्ष निवडीचा चेंडू अद्यापही राज्यपालांच्याच कोर्टात!

राज्यपालांनी काय म्हटलं होतं?

महाराष्ट्र सरकारने केलेली विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी नियम बदलला आणि गुप्त मतदान प्रक्रियेच्या ऐवजी आवाजी मतदान असा बदल केला. मात्र राज्यपालांनी ही आवाजी मतदानाची मागणी फेटाळून लावली होती. निवडणूक प्रक्रियेत करण्यात आलेला बदल असंवैधानिक आहे. असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी वेगवेगळी प्रक्रिया कशी काय असू शकते? असा सवाल राज्यपालांनी यावेळी उपस्थित केला होता.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे. हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्ष निवडला जावा अशी मागणी राज्यपालांनी केली होती. मात्र त्यांनी आवाजी मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवल्यामुळे अध्यक्षपद हे अद्यापही रिक्तच आहे. त्यामुळे विधासभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे.

    follow whatsapp