डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणारा दीक्षाभूमी येथील कार्यक्रम रद्द

मुंबई तक

• 06:32 AM • 13 Apr 2021

नागपूर: ‘नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनुयायांनी आपापल्या घरीच आंबेडकर जयंती साजरी करावी.’ असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने करण्यात आलं आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी नागपुरातील दीक्षाभूमी येथे लाखोच्या संख्येत अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: ‘नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे 14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनुयायांनी आपापल्या घरीच आंबेडकर जयंती साजरी करावी.’ असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

दरवर्षी 14 एप्रिल रोजी नागपुरातील दीक्षाभूमी येथे लाखोच्या संख्येत अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे स्मारक समितीने सर्व कार्यक्रम रद्द केलेले असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी संपूर्ण राज्यासह देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी लाखो नागरिक एकत्र येऊन जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोनाचं थैमान सुरु आहे. यामुळे अनेक कार्यक्रम आणि सण हे साधेपणानेच साजरे केले जात आहेत. अशावेळी आता दीक्षाभूमीवरील कार्यक्रम देखील रद्द करण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे.

मुंबईकरांची आता विविध सामान खरेदीसाठी गर्दी.. सुपरमार्केटबाहेर रांगा

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने देखील नागरिकांना कोरोना संकट लक्षात घेता आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. गर्दी होऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. याशिवाय मृतांचा आकडा देखील वाढत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 51 हजार 751 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 258 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 399 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 5 लाख 64 हजार 746 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 34 लाख 58 हजार 996 इतकी झाली आहे. आज महाराष्ट्रात 258 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 169 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 59 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर 30 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल (12 एप्रिल) मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्याच्या आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकी दरम्यान अजित पवार यांनी पुढच्या पंधरा दिवसात आरोग्यसेवांवर सर्वाधिक ताण पडण्याची चिन्हं असल्याचा इशारा दिला आहे.

कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp