मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 मार्च) थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. ज्याच्या आधारे आता फडणवीसांनी एक प्रकारे थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. याच कथित स्टिंग ऑपेशनमधील काही व्हीडिओ हे अत्यंत खळबळजनक आहेत. ज्यामध्ये अनेकदा शरद पवार यांचा उल्लेखही आला आहे.
ADVERTISEMENT
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर 2018 सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. पण याचवेळी हे काही वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरुन झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाहा काही खळबळजनक व्हीडिओ संवाद:
कथित स्टिंग ऑपरेशनमधील काही खळबळजनक Video
(व्हीडिओ 2)
तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?
ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो.
आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे.
शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?
सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले.
संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.
(व्हीडिओ 8)
– पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपी ला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.
(व्हीडिओ 9)
अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.
(व्हीडिओ 11)
– साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली.
– अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.
(व्हीडिओ 24)
– आपले टार्गेट कोण कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.
फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.
(ऑडिओ 1)
साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको.
पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के.
गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.
(व्हिडिओ 16)
अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी.
– नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात.
2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील.
काय लागतं. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही.
एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता.
मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.
(ऑडिओ 1)
पवार साहेबांची वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही. अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले. वळसे काहीच करीत नाही. आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते. कोर्टात काय भूमिका मांडायची, हे तेच ठरवतात. ते म्हणतील ते ठरते.
(व्हीडिओ 30 ई)
पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल.
(व्हीडिओ 32-जी-एच)
वकिल : साहेबांनी नगराळेला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले. पण, ऐकतच नाही, काय करायचे?
साहेब म्हणाले, तुला जे जे पाहिजे ते ते कर.
फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला.
वकिल : आपले जजेस आणायचे. कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची.
भाजपाला 10 कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल.
‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’, फडणवीसांनी विधानसभेत Pendrive देऊन केलेला प्रत्येक आरोप जसाच्या तसा…
देवेंद्र फडणवीस यांनी आज जे आरोप केले आहेत त्यातील हे काही संवाद अत्यंत धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात हे संपूर्ण प्रकरण बरंच गाजणार यात शंका नाही. मात्र आता या सगळ्याला महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष हे कशाप्रकारे तोंड देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT