Family Man ते निवडणुकीत ट्विस्ट आणणारा नेता, कोण आहेत Satyajeet Tambe?

मुंबई तक

13 Jan 2023 (अपडेटेड: 24 Jul 2023, 07:11 AM)

Satyajeet Tambe Profile: मुंबई: सत्यजीत सुधीर तांबे… (Satyajeet Tambe) हे अतिशय शांत, संयत.. अभ्यासू अशी त्यांची इमेज आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या घडामोडींनंतर सत्यजीत तांबेंची हीच इमेज बंडखोर, आक्रमक आणि महत्वाकांक्षी नेता अशी झाली आहे. त्याला कारण म्हणजे काल (12 जानेवारी) त्यांनी अचानक केलेली बंडखोरी. पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म हा सत्यजीत तांबेंचे […]

Mumbaitak
follow google news

Satyajeet Tambe Profile: मुंबई: सत्यजीत सुधीर तांबे… (Satyajeet Tambe) हे अतिशय शांत, संयत.. अभ्यासू अशी त्यांची इमेज आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या घडामोडींनंतर सत्यजीत तांबेंची हीच इमेज बंडखोर, आक्रमक आणि महत्वाकांक्षी नेता अशी झाली आहे. त्याला कारण म्हणजे काल (12 जानेवारी) त्यांनी अचानक केलेली बंडखोरी. पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म हा सत्यजीत तांबेंचे वडील सुधीर तांबेंना मिळालेला असतानाही अखेरच्या क्षणी सुधीर तांबेंनी माघार घेतली आणि सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामुळे कालपासून सत्यजीत तांबे हे प्रचंड चर्चेत आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) नेमका ट्विस्ट आणणारे सत्यजीत तांबे आहेत तरी कोण हेच आपण जाणून घेऊयात आता सविस्तरपणे. (family man to leader who brought a twist in vidhan parishad election who is satyajeet tambe)

हे वाचलं का?

सत्यजीत तांबे हे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांचे पुत्र आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील युवा अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख आहे. सत्यजीत तांबे हे 2000 सालापासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी NSUI च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेला. 2007 साली अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत त्यांची एंट्री झाली होती. 2018 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले होते. राहुल गांधींच्या जवळचे नेते अशीही तांबेंची ओळख आहे.

विधानपरिषद: ‘पाकळ्या मिटून घेण्याचं नवं ऑपरेशन कमळ?’, बोचरी टीका

तसेच ही ओळख होण्यामध्ये संगमनेर कनेक्शन देखील आहे. संगमनेरचं थोरात कुटुंब हे काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब म्हणून ओळखलं जातं. भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबाचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. याच थोरात कुटुंबाची मुलगी दुर्गा यांचा विवाह सुधीर तांबेंशी झाला. याच तांबेचे सत्यजीत हे सुपुत्र आहेत.

सध्या सत्यजीत जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या आई दुर्गाताई तांबे या संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत.

सत्यजीत तांबे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन आणि त्यांच्या सामाजिक जीवनातील उपस्थितीवरुन ते एकदम ‘फॅमिली मॅन’ वाटतात. त्यांच्या पत्नी डॉ. मैथिली आणि मुलं अहिल्या, सूर्या यांच्यासोबतचे अनेक आनंदी क्षण ते सोशल मीडियावर शेअर करतात. मामा बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या मुलींसोबतही ते प्रत्येक सणाला, सुखदु:खाच्या क्षणी सोबत दिसतात.

महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारे बाप-लेक, काय म्हणाले काँग्रेसबद्दल?

पण काही वेळा सत्यजीत तांबेंची बंडखोर भूमिका, त्यांचे आक्रमक विचार समोर आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सिटीझनविल पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलवलं होतं. तेव्हा फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांसमोरच त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. 2019 ला निवडणूक निकालानंतर भाजप सेनेत सुरु असलेल्या वादादरम्यान त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली होती.

‘राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेल याची खात्री नाही. मित्र म्हणून एवढाच सल्ला की जे मिळवायचं आहे ते आत्ताच मिळवा. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका.’ त्यामुळेच आता सत्यजीत तांबेंची पावलंही याच पोस्टप्रमाणे वळू लागली आहेत.

सत्यजीत तांबेंची ही वाटचाल भाजपातील त्यांच्या प्रवेशाची नांदी म्हणायची की काँग्रेसला दिलेला शह हे काही दिवसात स्पष्ट होईलच. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ट्विस्ट आणला आहे त्याची चर्चा पुढचे अनेक दिवस सुरू राहील यात वाद नाही.

    follow whatsapp