व्यंकटेश दुदुमवार, प्रतिनिधी, भंडारा
ADVERTISEMENT
दारुच्या व्यसनाने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी केल्याची उदाहरणं पदोपदी मिळतात. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली. दारूमुळे निर्माण झालेली आर्थिक तंगी दूर करण्यासाठी घेतलेल्या उसनवारीच्या पैशामुळे घरात झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीने स्वतःला पेटवून घेतल्यावर पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीचाही पत्नीसह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात आई वडिलांना मुकलेल्या त्यांचा 3 वर्षांचा चिमुकला अनाथ झाला आहे.
Pune Crime: पत्नीला फसवून नेलं बाहेर, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली गळा चिरून हत्या
भंडारा जिल्ह्यातील पहेला निवासी मेघाचे चार वर्षापूर्वी टेकेपार डोडमाझरी येथील ग्रामपंचायतित ऑपरेटर पदावर कार्यरत असलेल्या महेंद्र सिंगाडे याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर वर्षभराने या दोघांना एक मुलगाही झाला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महेंद्रला दारूचे व्यसन होते. त्याचे हे व्यसन वाढल्याने त्याला आर्थिक तंगीने घेरल्याने अनेकांची उधारी महेंद्रने केली होती. उसनवारिच्या पैशातून देणेकरी घरी पैसे मागायला येत होते. ही बाब मेघाला मुळीच आवडत नसे. येणाऱ्या देणकऱ्यांवरून हेंद्र आणि मेघा यांच्यात सतत वाद व्हायचे.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या
घटनेच्या दिवशी शनिवारी 15 जानेवारी रोजी त्यांच्यात असाच उसनवारीच्या पैशातून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की मेघाने आपल्या अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. यावेळी पतीने आपली चूक लक्षात घेत पत्नीला जळत्या स्थितीत बघून वाचवायला गेला खरा, मात्र त्याचे प्रयत्न निर्रथक ठरले. या दोघांचाही जळून मृत्यू झाला. झालेली आरड़ाओरड नंतर नातेवाईकांना घडलेला प्रकार कळताच कारधा पोलिसांना त्वरित बोलवण्यात आलं. मृतदेहांचे शव विच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून या दोघांचा तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे.
यात 3 वर्षांचा मुलगा आजी कड़े खेळत असल्याने सुखरूप बचावला खरा मात्र आई वडिलांच्या दुर्देवी मृत्युने तो अनाथ झाला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासह पसरताच जिल्ह्यात आता सर्वस्तरावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT