गुंतवणुकीवर भरगोस परतावा देण्याच्या बहाण्यानं नागपुरातील एका 41 वर्षीय व्यावसायिकानं आपली 7.63 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जितेंद्र नरहरी जोशी यांनी जयंत गुलाबराव सुपारे (43) आणि त्यांची पत्नी केसरी (35) यांनी 35 टक्के वार्षिक परतावा देण्याचं आश्वासन देऊन कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं आणि आपली फसवणूक केली असा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांना सुरुवातीला चांगले दिले आणि त्यांना अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं गेलं. पोलिसांनी सांगितलं नंतर व्यावसायिरानं तब्बल 7.63 कोटी रुपये गुंतवले. तसंच, 2024 च्या मध्यानंतर या जोडप्याने अचानक पैसे देणं बंद केलं. ठरल्याप्रमाणे परतावा मिळावा या मागणीसाठी जोशी यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी सर्व बोलणंच बंद केलं. एकूणच, याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा >> Mumbai Crime News : वासनांध बापानं पोटच्या मुलीलाही सोडलं नाही, शेवटी लेकीनं आपबीती मैत्रिणीला सांगितली, मुंबईतील संतापजनक घटना...
दोन महिलांकडून इंजिनीअरची 20 लाखांची फसवणूक
दुसरीकडे, नागपुरातच एका अभियंत्याची 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपींपैकी सेजल साधवानीने चार्टर्ड अकाउंटंट असल्याचं सांगून तक्रारदार अजिंक्य माहुरे यांना भरगोस परतावा देण्याचं आश्वासन देऊन विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं.
हे ही वाचा >> Cyber Crime : एअर होस्टेसला डिजीटल अटक करण्याची धमकी, मनी लॉन्ड्रींगमध्ये नाव आल्याचं खोटं सांगून सायबर ठगांनी उकळले तब्बल...
खासगी बँकेत काम करणाऱ्या माहुरेला 1 लाख रुपये गुंतवायला लावले आणि 20 लाख रुपये परत करण्याचं आश्वासन दिलं. माहुरे यांच्याकडून आधार व पॅनकार्डचा तपशील मागितला. या कागदपत्रांचा वापर करून आरोपींनी 17 लाखांहून अधिक रुपयांचे कर्ज घेतलं.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर दोन कर्ज एजन्सींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी कर्ज घेतले आहे आणि ते फेडा असं सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचं माहुरेला कळलं.
ADVERTISEMENT
