नोएडा: राजधानी दिल्लीच्या नजीक असणाऱ्या नोएडामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये आग लागल्याचे वृत्त नुकतंच हाती आलं आहे. ही आग एवढी भीषण होती की स्पा सेंटरमध्ये असलेल्या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. मात्र, दुर्दैवाने या आगीच्या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एक स्त्री आणि पुरुषाचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-24 पोलिस स्टेशन हद्दीत एक स्पा सेंटर आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या स्पा सेंटरला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, ही आग कशी लागली याचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाकडून आग लागलेल्या भागाची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच या आगीचं कारण समजू शकेल.
भिवंडी फर्निचरच्या गोदामाला आग, तीन गोदामं जळून खाक
दुसरीकडे महाराष्ट्रातील भिवंडती काही दिवसांपूर्वीच भिवंडतील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली होती.
भिवंडी ग्रामीण भागातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरात फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झालं होतं. ही आग एवढी भीषण होती की या आगीने इतर दोन फर्निचर गोदामांना आपल्या भक्षस्थानी घेतलं होतं. अशा पद्धतीने या आगीत तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
न्यूयॉर्कमधल्या इमारतीला भीषण आग, 9 लहान मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी आणि ठाणे महापालिकेच्या दोन-दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. परंतू आगीची तीव्रता पाहता ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला चार ते पाच तासांचा कालावधी लागला होता. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर बनवण्याचं साहित्य आणि फर्निचर जळून खाक झालं होतं.
ADVERTISEMENT