मुलानेच केला बापाचा खून, कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्याला संपवलं

मुंबई तक

• 03:05 PM • 03 Feb 2022

व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: गडचिरोली शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतर असलेल्या विसापूर या गावात घडलेल्या खुनाच्या घटनेत मुलाने बापाचा कुऱ्हाडीने निर्घ-ण हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या इसमाचे नाव दामोदर भिकाजी तांगडे (वय 55 वर्ष) असून खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय 24 वर्ष) आहे. आरोपी हा खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात […]

Mumbaitak
follow google news

व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: गडचिरोली शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतर असलेल्या विसापूर या गावात घडलेल्या खुनाच्या घटनेत मुलाने बापाचा कुऱ्हाडीने निर्घ-ण हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या इसमाचे नाव दामोदर भिकाजी तांगडे (वय 55 वर्ष) असून खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय 24 वर्ष) आहे. आरोपी हा खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गडचिरोली पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

हे वाचलं का?

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन गडचिरोलीची टीम घटना स्थळावर दाखल झाली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत दामोदर यांना दोन मुले असून मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी 60 या पथकात कार्यरत आहे. तर लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता.

तेजस याला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे दारूच्या नशेत वडिलांसोबत झालेल्या वादातून तेजसने थेट कुऱ्हाडीने आपल्याच वडिलांची हत्या केली. हा सगळा प्रकार पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाला आहे.

Crime News : बायकोसोबत झालेल्या भांडणानंतर जुगारी बापाकडून सात वर्षाच्या मुलीची हत्या

पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या नियोजनबद्ध तपासामुळे आरोपीस अवघ्या दोन तासात ताब्यात घेण्यात आहे. या प्रकरणी पुढील तपास आता गडचिरोली पोलीस करीत आहेत.

लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

काही दिवसांपूर्वीच वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात एका मुलाने वडिलांची अशाच प्रकारे कुऱ्हाडीने हत्या केल्याची समोर आलं होतं. माझं लग्न का करुन देत नाही? असा प्रश्न विचारत मुलाने आपल्या वडीलांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा प्रमोद धर्मा भारती याने आपले वडील धर्मा भारती यांच्याशी, माझं लग्न का करुन देत नाही म्हणून वाद घातला होता. या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला होता की संतापलेल्या प्रमोदने कुऱ्हाडीने आपल्याच वडीलांच्या डोक्यात आणि पायावर वार करत त्यांना गंभीर जखमी केलं होतं.

या घटनेनंतर नातेवाईकांनी जऊळका पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या धर्मा भारती यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी उपचारादरम्यान मध्यरात्री दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यानंतर मुलगा प्रमोदवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.

धक्कादायक ! भांडण करु नको सांगणाऱ्या वडिलांची १३ वर्षीय मुलाकडून हत्या

    follow whatsapp