नाशिकमध्ये आज सकाळ पासून मनसे कार्यकर्ते ज्या ठिकाणी नमाज पठण होत आहे तेथे हनुमान चालीसा लावायचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे याला काहीसा चाप बसला आहे. नाशिकच्या सातपूर येथील मशिदीसमोर ५ ते ७ कार्यकर्त्यांनी चालीसा लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुधबाजार येथे महिला कार्यकर्त्या जय श्रीराम नारे देत मशिदीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ३३ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे काय दाखल जातात हे दुपारी स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये एकाही धार्मिक स्थळावरील भोंग्यांची परवानगी नाही.
एकीकडे पुणे आणि मुंबईत धार्मिक स्थळावरील भोंगे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत असताना नाशिक पोलिसांनी आतापर्यंत एक ही परवानगी दिलेली नाही, नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण ६० अर्ज आलेले त्यापैकी ३९ अर्ज निकाली काढले असून एकालाही भोंग्यांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही, पोलिसांच्या नुसार सर्वांनी पहाटे पासून सरसकट परवानगी मागितली होती , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देता येते हे कारण पुढे करत परवानगी दिली नाहीये,
नाशिकमध्ये एकूण ८७ मशिदी तर ७७५ मंदिरं आहेत, यापैकी कुणीही भोंग्यांसाठी परवानगी घेतलेली नाही, पोलिस राज्यात भोंगे परवानगीसाठी काय भूमिका घेते याचा अभ्यास करून पुढे निर्णय घेणार आहेत. नाशिक पोलिसांनी एकूण १४ मनसे पदाधिकाऱ्यांना हृद्यपारीच्या नोटिसा दिल्या तर १०० च्या वर कार्यकर्त्यांना कलम १४९ नुसार नोटीसा देण्यात आल्या होत्या.
काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?
औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेली कलम जामीनपात्र आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडत संपूर्ण देशभरातील हिंदू नागरिकांना आवाहन केलेलं आहे.
सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनात राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्याऐवजी हिंदू नागरिकांना भोंग्यांविरुद्ध भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. 4 मे रोजी जिथे यांचे भोंगे अजान आणि बांग देतील तिकडे आपण भोंग्यावर हनुमान चालीसा लावावी. भोंग्याचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजू द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT