अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यकारभार कसा करायचा हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं सल्ला राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे. माझे अजूनही प्रकृतीबद्दल समस्या आहेत. जे माझ्यासोबत घडलं, त्यावर कुणी कारवाई केली नाही.”
नवनीत राणांनी तब्येत ठीक नसतानाही डिस्चार्ज का घेतला?
“कुणी दंगा केला, तर ठाकरेंच्या गुंडांनी केला. अमरावती आणि मुंबईत आमच्या घरांच्या बाहेर गुंड पाठवण्यात आले. शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला. त्याबाबत मी तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. संजय राऊत पोपट आहेत. रवी राणांच्या भाषेत चवन्नी छाप आहेत. त्यांनी २० फूट खड्ड्यात गाडू असं विधान केलं. त्यावरही कारवाई झाली नाही. त्यावर कारवाई व्हावी म्हणून मी दिल्लीत जात आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
“आम्ही आमदार आणि खासदार आहोत आणि भारतीय नागरिक म्हणून नेहमीच न्यायालयाचा सन्मान करत आलोय. पुढेही सन्मान करू. न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन केलं आहे. एकही शब्द आम्ही त्या प्रकरणाबद्दल बोलले नाही. हनुमान चालीसा आणि मातोश्री यासह संबंधित प्रकरणाबद्दल काही विधान केलं नाही,” अशी भूमिका नवनीत राणा यांनी मांडली.
‘१४ वर्ष तुरूंगात राहायला तयार’; रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणांचं ठाकरेंना आव्हान
“आमच्यासोबत जे काही घडलं. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्याविरुद्ध मी दिल्लीत जाऊन तक्रार करणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहे. पोलीस कोठडीपासून ते तुरुंगापर्यंत जे काही माझ्यासोबत घडलं. त्यांनी जे काही केलं, तुरुंगात गेल्यावर आपण लोकप्रतिनिधी नसतो. कैद्यासारखं ट्रीट केलं जातं. पण त्यालाही काही नियम असतात,” असं राणा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
“मी त्यांना इशारा दिला आहे, कारण कुणाच्या नावावर बसून खाणं खूप चांगलं असतं. पण कष्ट करून खाण्यात खूप फरक आहे. उद्धव ठाकरे खूप ज्ञानाच्या गोष्टी करतात. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी सिद्धांतांची गोष्ट करू नये,” असं त्या म्हणाल्या.
12 दिवसांचा विरह.. रवी राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला
“देवेंद्र फडणवीसांनीही पाच वर्षे राज्य कारभार केला आहे. पण त्यावेळी असं सूडाचं राजकारण महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्र कसा चालवायला हवा, हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं. कोणत्या भावनेनं राज्यकारभार केला पाहिजे,” असं राणा यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT