अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याला ढगफुटीसदृष्य पावसाने झोडपून काढलं आहे. दर्यापूर शहर आणि ग्रामीण भागात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सकाळी पाच वाजल्यापासून सुरु झालेल्या पावसाने दोन अडीच तास बरसत संपूर्ण दर्यापूर तालुक्याला झोडपून काढलं.
ADVERTISEMENT
या पावसामुळे दर्यापूरचा बहुतांश भाग जलयम झाला आहे. शहरातील सर्व नाल्यांना पूर आला असून हे पाणी वस्तीत शिरल्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. थिल्लोरी गावातील अनेक घरं अजुनही पाण्याच्या वेढ्यात आहेत. येवदा-सांगळूद रस्ता या पावसामुळे बंद झाला असून अकोट रोडवरील पुलावरुनही पाणी गेल्यामुळे वाहतूक २-३ तास ठप्प झाली होती.
दरम्यान स्थानिक तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी नुकसानाचे पंचनामे करुन मदत पोहचवण्याचं काम करत आहेत. गेल्यावर्षीही थिल्लोरी गावात पुराचं पाणी शिरलं होतं. ज्यात १८८ घरांचं नुकसान झालं होतं. नाल्याच्या खोलीकरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुनही काम योग्य पद्धतीने झालेलं नसल्यामुळे या पावसाचही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
Monsoon चं पुनरागमन, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार – IMD
ADVERTISEMENT