सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता यावा यासटी कोव्हिड ऑफलाईन लसीकरण प्रक्रिया आणि रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ऑनलाईन ई पास सुविधाही महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असं या पद्धतीचं नाव आहे. यामुळे नागरिकांना ई पास मिळणं अगदी सहज शक्य होणार आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org ही लिंक शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि नागरिकांना ई -पास देण्यासाठी वेब लिंक पूर्वीच विकसित केली आहे. सदर वेब लिंकचा उपयोग करून आता सामान्य मुंबईकरांना ई पास उपलब्ध होऊ शकणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवसासाठी हा ई पास उपलब्ध होऊ शकणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांसाठी वापरत असलेल्या या वेब लिंकमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने आता सर्वसामान्य नागरिकांचा प्रवासाचा पास उपलब्ध व्हावा म्हणून अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. https://epassmsdma.mahait.org या लिंकचा उपयोग करून मुंबईकरांना आता युनिव्हर्सल पास मिळू शकणार आहे. सदर लिंक ही वेब ब्राऊजरवर उपलब्ध असणार आहे.
या ई पास सुविधेनसुरा ज्या नागरिकांचे कोव्हिड लसींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस 14 दिवस पूर्ण झाले आहेत. ते नागरिक या ई पाससाठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील त्यांचे कोव्हिड लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी या लिंकवर आपोआप होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही. दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले नसतील आणि त्यांनी जर अर्ज केला तर त्या माणसांना 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ई पास उपलब्ध होईल.
काय आहे युनिव्हर्सल ई पासची पद्धत?
सर्वात आधी https://epassmsdma.mahait.org ही लिंक ओपन करावी.
त्यानंतर या लिंकवर Travel Pass For Vaccinated Citizens यावर क्लिक करावं.
त्यानंतर नगारिकांनी आपला कोव्हिड लसीकरणासाठीचा मोबाईल क्रमांक नमूद करावा
यानंतर मोबाईल वर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मेसेजद्वारे मिळेल.
ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील
त्यामध्ये जनरेट पास या पर्यायावर क्लिक करा
क्लिक केल्यानंतर कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी तपशील समोर दिसेल
या तपशिलामध्ये सेल्फ इमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येऊ शकतं. मोबाईल कॅमेराद्वारे सेल्फी काढूनही फोटो अपलोड करता येईल
ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पाससाठी मेसेजद्वारे लिंक मिळे
मोबाईलवर आलेली लिंक तिकिट खिडकीवर पास दाखवल्यानंतर पास मिळू शकेल
ADVERTISEMENT