Saroj Ahire: विधानसभेतील हिरकणी, चिमुकल्यासह आमदार थेट विधिमंडळात!

मुंबई तक

19 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:32 AM)

NCP MLA Saroj Ahire: नागपूर: कोणतीही महिला जेव्हा आई होते तेव्हा ती अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जाते. तिच्यासाठी तिचं बाळ हे सर्वस्व असतं. मात्र, त्याचवेळी ती आपली कर्तव्य देखील चोखपणे पार पाडत असते. पण जेव्हा एखादी महिला सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची कर्तव्यं बजावते तेव्हा चर्चा तर होणारच ना.. सध्या अशाच एका हिरकणीची चर्चा नागपूरच्या विधिमंडळात (Nagpur […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

NCP MLA Saroj Ahire: नागपूर: कोणतीही महिला जेव्हा आई होते तेव्हा ती अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जाते. तिच्यासाठी तिचं बाळ हे सर्वस्व असतं. मात्र, त्याचवेळी ती आपली कर्तव्य देखील चोखपणे पार पाडत असते. पण जेव्हा एखादी महिला सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची कर्तव्यं बजावते तेव्हा चर्चा तर होणारच ना.. सध्या अशाच एका हिरकणीची चर्चा नागपूरच्या विधिमंडळात (Nagpur legislative assembly) जोरदार सुरु आहे. कोण आहे ती महिला आणि का केली जातेय तिच्याविषयी एवढी चर्चा जाणून घेऊयात सविस्तर. (hirkani in the legislative assembly mla saroj ahire directly reached nagpur legislature with a 2 month old baby)

हे वाचलं का?

नागपुरात (Nagpur) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून (19 डिसेंबर) सुरुवात झाली आहे. यानिमित्त नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन थेट नागपूर विधान भवनात अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

मूळच्या नाशिकच्या असलेल्या सरोज अहिरे यांनी शिर्डीवरुन समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत थेट नागपूर गाठलं. यावेळी त्यांचा प्रवासाचा अनुभव आणि दोन महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्यानंतर त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत याविषयी त्यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं.

पाहा आमदार सरोज अहिरे नेमकं काय म्हणाल्या…

‘आम्ही नाशिक व्हाया शिर्डी समृद्धी महामार्गाने आलो आहे. प्रवासात बऱ्याचशा अडचणी आल्या. पण आता त्याच अडचणी सारखं-सारखं सांगणं काही बरोबर नाही. प्रवास तसा खडतर होता. मी इथपर्यंत आलेले आहे. काल पूर्ण वेळ आम्ही आराम केला आहे आणि आता सभागृहाचं कामकाज करण्यासाठी मी इथे आलेली आहे.’

‘मी सभागृहात बसलेली असली तरी माझं लक्ष विचलित होणार नाही. पण कुठे तरी आई म्हणून मनाच्या कोपऱ्यात बाळ रडतंय का?, किंवा त्याला आपली गरज आहे का.. हा प्रश्न नेहमीच प्रत्येक आईच्या डोक्यात असतो. तसाच माझ्याही राहील तिथे.’

‘आमच्याकडे पोलिसांकडून माहिती आलीये’, एकनाथ शिंदे भडकले, विरोधकांना सुनावलं

‘बाळ इथे कक्षात सुरक्षित राहील माझ्या कुटुंबातील काही मंडळी आली आहेत जेव्हा मला सभागृहात निरोप येईल की, बाळाकडे या म्हणून तेव्हा मी पुन्हा कक्षात येईल आणि बाळाकडे लक्ष देईन पूर्ण.’

‘एका बाळाची आई आणि एक आमदार अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी बजावणं हे तसं खूप कठीण आहे. पण माझ्या मतदारसंघातील लोकांनी जवळपास तीन महिन्यांपासून मला समजून घेतलं आहे. कारण मी तीन महिन्यांपासून मतदारसंघात फिरू शकलेली नाही. पण तरीही मतदारसंघातील माझी कामं सुरु आहेत.’

‘खाऊन महाराष्ट्राची भाकरी, गुजरातची…’, शिंदे गटाच्या वर्मावर पहिल्याच दिवशी बोट

‘मोबाइलद्वारे असेल किंवा अधिकाऱ्यांना फोन करुन असेल किंवा इतर माध्यमातून माझं ऑफिस ठामपणे काम करतंय. अनेक भूमिपुजनं मी नसतानाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या, ज्येष्ठ लोकांच्या हस्ते पार पडलेली आहे. त्यामुळे माझं काम सुरु आहे. यामुळे नागरिकांनी मला समजून घेतलं आहे. अजून तीन महिन्यांचा प्रश्न आहे.’

‘मला जिथे शक्य होईल तिथे मी बाळाला घेऊन काम करेन. जिथे मला शक्य होणार नाही.. तिथे माझी जनता तेवढी समजदार आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच मी इथपर्यंत येऊ शकलेली आहे.’ असं म्हणत सरोज अहिरे यांनी आपल्या आईपणाच्या जबाबदारीसोबतच मतदारसंघातील नागरिकांसाठीही ठामपणे काम करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या याच वृत्तीचं आता अनेक जण कौतुक करत आहेत.

    follow whatsapp