मोबाईलमुळे आपण अनेकदा घरांमध्ये भांडणं होताना पाहिली आहेत. आपल्या मुलांच्या मोबाईल जास्त वापरण्याच्या सवयीमुळे घरात आई-बाबा नेहमी चिंतेत असतात. जसे या मोबाईलचे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. भंडारा जिल्ह्यात मोबाईमुळे झालेल्या भांडणामुळे बायकोने आपल्या नवऱ्याचे ओठच कापले आहेत.
ADVERTISEMENT
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ भागात ही घटना घडली आहे. खेमराज बाबुराव मूल असं जखमी व्यक्तीचं नाव असून लाखंदूर पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पत्नीने पतीने हातातला मोबाईल न दिल्याने चक्क आपल्याच नवऱ्याला विळ्याने मारहाण केली. या मारहाणीत नवऱ्याचे ओढच कापले गेल्यामुळे त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील खेमराज मूल यांचा मोबाईल मागील तीन दिवसांअगोदर बिघडला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल काही दिवस वापरासाठी मागितला. त्यानंतर दोन दिवस होऊनही मोबाईल पत्नीला दिला नाही, त्यामुळेच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात पत्नी प्रेमीना खेमराज मुल हिने घराच्या खोलीत असलेला लोखंडी विळा आणून पती खेमराजच्या तोंडावर वार केला. त्यामुळे खेमराजचे ओठ कापले असून जबर दुखापत झाली. त्याला लागलीच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
ADVERTISEMENT