लैंगिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या पतीने वेगवेगळ्या मित्रांना घरी बोलवून आपल्या डोळ्यांसमोर पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे गेली तीन वर्ष हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी बारामती पोलिसांनी विकृत पतीसह पाच जणांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २०१६ मध्ये आरोपी बरोबर झाला होता. लग्नानंतर वर्षभरातच पती-पत्नीमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाली, यानंतर पीडितेच्या पतीला समलैंगिक संबंधाचे आकर्षण वाटायला लागले. सुरुवातीच्या काळात पत्नीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यानंतर आरोपी पतीने पत्नीच्या नावाने आपल्या मित्रांना What’s App मेसेज करुन घरी बोलावलं.
यानंतर आरोपीने पत्नीला आपल्या मित्रांसोबत शाररिक संबंध ठेवायला भाग पाडले. आपले मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना आरोपी पती या आसुरी प्रक्रियेचा आनंद घेत स्वतःला उत्तेजित करत होता. २०१७ ते २०२१ या काळात आरोपी पतीने आपल्या मित्रांना बोलावून शाररिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या प्रकारावरुन पती आणि पत्नीमध्ये अनेकदा वादही झाले. एका क्षणाला पत्नीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
परंतू पतीने पुन्हा एकदा पत्नीची माफी मागून तिची समजूत काढत तिला घरी बोलावलं. परंतू कालांतराने पतीने पुन्हा तोच प्रकार करायला सुरुवात केली. ज्यानंतर पत्नीने कंटाळून माहेरी जात आपल्या आईला हा प्रकार सांगितला, अशी माहिती बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत विकृत पतीसह पाच मित्रांना अटक केली आहे. या घटनेतील इतर आरोपींबद्दलची ओळख पटवण्याचं काम सुरु असून अटक केलेल्या आरोपींना बारामती न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT