मुंबईत पाच हजार रूपयांसाठी डोक्यात लाटण्याने मारहाण करून एका महिलेने केली दुसऱ्या महिलेची हत्या

मुंबई तक

• 04:31 AM • 21 Jan 2022

पाच हजार रुपयांसाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात लाटणे मारून तिची हत्या केली आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या रमाबाई नगर या भागात ही घटना घडली आहे. रेखा धोबी असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती 25 वर्षांची होती. ममता उके या 51 वर्षांच्या महिलेने तिची हत्या केली आहे. रेखाचा पती आशिष याने 20 टक्के व्याजाने ममता […]

Mumbaitak
follow google news

पाच हजार रुपयांसाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात लाटणे मारून तिची हत्या केली आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या रमाबाई नगर या भागात ही घटना घडली आहे. रेखा धोबी असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती 25 वर्षांची होती.

हे वाचलं का?

ममता उके या 51 वर्षांच्या महिलेने तिची हत्या केली आहे. रेखाचा पती आशिष याने 20 टक्के व्याजाने ममता उकेकडून पाच हजार रूपये घेतले होते. त्याचं व्याज त्याने दिलं होतं. मात्र ममताला मुद्दलाचे पाच हजार हवे होते. यासाठी ममता वारंवार रेखाकडे आणि आशिषकडे पैसे मागत तगादा लावत होती. गुरूवारी सकाळी ममता ही रेखाच्या घरी गेली आणि पैसै मागू लागली. त्या दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. ज्यानंतर ममताने रेखाच्या घरातलं लाटणं घेऊन तिला डोक्यात आणि अंगावर मारहाण केली. यात रेखाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

गोणीत दोन तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह, पतीने हत्या केल्याचं उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या वादातून ममता आणि रेखा या दोघींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ममता उकेने रेखाच्या डोक्यात तिच्याच घरातलं लाटणं घेऊन डोक्यावर आणि अंगावर मारहाण केली. यामध्ये रेखाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आम्ही ममता उकेला अटक केली आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. घाटकोपरच्या पंतनगर भागात ही घटना घडली आहे. रेखा ही 25 वर्षीय महिला होती.

अज्ञात मारेकऱ्याने केली 58 वर्षीय महिलेची हत्या, डोंबिवलीतली धक्कादायक घटना

रेखाच्या पतीने काय म्हटलं आहे? ममता उके ही माझ्या मागे पैशांचा तगादा लावत होती. मी तिला सांगितलं होतं की पैसे मिळाले की मी तुला पैसे देईन. माझा एक चेक मिळणार होता. तो मला मिळाला नाही. त्यामुळे ममताला पैसे देण्यासाठी उशिर झाला. यानंतर ती गुरूवारी परत माझ्या घरी आली होती. त्यावेळी तिने पुन्हा एकदा माझ्या पत्नीकडे आणि माझ्याकडे पैशांचा तगादा लावला. मी घरातून बाहेर पडलो होतो त्यानंतर ती पुन्हा आमच्या घरी आली आणि तिने माझ्या पत्नीला मारहाण केली. या घटनेत माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. मी तिच्याकडून 20 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. मी व्याज वेळोवेळी देत होतो. मुद्दल द्यायचं राहिलं होतं. आता माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर माझी दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. त्यांच्याकडे कोण बघणार? हा प्रश्नही महिलेच्या पतीने उपस्थित केला आहे.

    follow whatsapp