योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेसहपुरुषाचा मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या दुहेरी हत्याप्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली.
पुरुष मृतक हा वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगेतालुक्यातील बिहाड गावातील रहिवासी आहे. तो सविता नामक महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने त्याच्याचदोन भावांनी मिळून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. बुटीबोरी पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदी पत्रात सापडलेला मृतदेह हा उत्तम बोडके आणि सविता नामक महिलेचा आहे. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोघेही विवाहित असून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील बिहाड गावातील रहिवासी आहेत. दोघेही विवाहितअसल्याने उत्तम आणि सविता यांच्यातील प्रेम संबंधाला घरच्यांचा तीव्र विरोध होता, त्यामुळे दोघांनी नागपूरमध्ये एकत्र राहण्याससुरुवात केली होती.
त्यांच्या या कृतीमुळे कुटुंबाची गावात आणि समाजात बदनामी झाल्याने संतापलेल्या उत्तमच्या दोन भावांनीसंगनमत करून उत्तम आणि सविताची हत्या केली,त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह दगडाला बांधून ते वेणा नदीतफेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
मृतक उत्तम बोडके यांच्या भावांनी त्याला शेतीचा वाद सोडवायचा असल्याचे कारण सांगून बोलावून घेतले होते. दोघेही शेतावरगेल्यानंतर त्यांना एका गाडीत कोंबून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघांचा ही मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी दोन्हीमृतदेहाचे हात पाय नायलॉन दोरीने बांधले. त्यानंतर ते मृतदेह 25 किलो वजनाच्या दगडाला बांधून मृतदेह वेणा नदीच्या पात्रातफेकून आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मृतक उत्तमचे दोन भाऊ आणि त्यांना मदत करणाऱ्या आणखीदोघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT