केंद्रीय यंत्रणांच्या धाडींबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या, वाचल्या असतील. यातच भर पडलीये ती म्हणजे आयकर विभागाने जालन्यात केलेल्या छापेमारीची. आयकर विभागाला माहिती मिळाली आणि स्क्रिप्ट लिहिली गेली. गाडीवर राहुल आणि अंजली शुभविवाहचे पोस्टर्स. गाडीच्या मागे ‘दुल्हन हम ले जाएंगे’च्या स्टिकर्स. वऱ्हाडी बसलेल्या गाड्या! असा सगळा लवाजमा घेऊन आयकरने केलेल्या छापेमारीत तब्बल ३९० कोटींची माया उघडकीस आलीये. जालन्यात केलेल्या आयकर विभागाच्या कारवाईची यामुळेच देशात चर्चा होतेय.
ADVERTISEMENT
आयकर विभागानं जालन्यातील उद्योजकांवर धाडी का टाकल्या?
नाशिकच्या आयकर विभागाच्या अंतर्गत असलेल्या औरंगाबादच्या टीमला माहिती मिळाली की, जालना येथील एका मोठ्या स्टील कारखानदाराने कोट्यवधींचं अतिरिक्त उपत्न मिळवलं. हा व्यवहार कुठेही रेकॉर्डवर येऊ नये म्हणून रोखीने व्यवहार केले. या व्यवहारांमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा प्रकारातून आयकर विभागाने छापेमारीचा प्लान आखला.
Income Tax : २६० कर्मचारी, १२० गाड्या आणि जालन्यात उद्योजकांवर धाडी
माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने कारवाईची माोहीम हाती घेतली. या छापेमारीची कानोकानही माहिती कुणाला कळू नये म्हणून आयकरने शक्कल लढवली. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी कथा तयार केली गेली.
आयकर विभाग धाड : ‘दुल्हन हम ले जाएंगे’ होता कोडवर्ड
आयकर विभागाचे राज्यातील नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई येथील २६० अधिकारी-कर्मचाऱ्यांना यात सामावून घेण्यात आलं. त्यासाठी १२० गाड्या वापरण्यात आल्या. या गाड्यांवर राहुल आणि अंजली शुभविवाह. ‘दुल्हन हम ले जाएंगे’ असे स्टिकर्स लावण्यात आले. एखाद्या लग्नाचं वऱ्हाड असल्यासारखा लवाजमा तयार करण्यात आला. या सगळ्या मोहिमेत गाड्या ओळखण्याचा एक कोडवर्ड होता, तो म्हणजे ‘दुल्हन हम ले जाएंगे’!
वऱ्हाडी म्हणून आलेले अधिकारी घुसले कारखाने आणि घरात
आयकर विभागाने एकाचवेळी स्टील उद्योजकाच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर धाडी टाकण्यासाठी पथक तयार करण्यात आली. वऱ्हाडी वाटणारे अधिकारी कर्मचारी जालन्यात दाखल होताच, उद्योजकाच्या मालमत्तांमध्ये ही पथके घुसली आणि छापेमारी सुरू झाली. तब्बल आठ दिवस म्हणजे १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या काळात हे धाडसत्र आणि झाडाझडती सुरू होती.
उद्योजकाच्या घरात आयकर विभागाला काही मिळालं नाही. जालन्यापासून काही अंतरार असलेल्या उद्योजकाच्या फार्महाऊसवर पोहोचलेल्या पथकाच्या हाती, मात्र घबाडचं लागलं. कापडी पिशव्यात पॅक केलेल्या नोटांची बंडलं बघून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डोळेच विस्फारले. आठ दिवस चाललेल्या या कारवाईत फक्त पैसेचे मिळाले नाहीत, तर ३२ किलो सोनं ज्याची किंमत जवळपास १६ कोटी रुपये आहे. हिरे-मोती आणि जमीन, बंगले, बँकांतील ठेवीसह इतर संपत्तीची कागदपत्रेही मिळाली. जी आयकर विभागाने जप्त केली आहेत. या कारवाईत जवळपास ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीये.
ADVERTISEMENT