विविध ट्विटच्या माध्यमातून चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. तर नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतला ट्विटरने मोठा झटका दिला. ट्विटरने कंगनाचं अकाऊंट काही दिवसांपूर्वी सस्पेंड केलं. तर त्यानंतर आता इन्स्टाग्रामने देखील कंगनाची एक पोस्ट डिलीट करून टाकली आहे.
ADVERTISEMENT
ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अक्टिव्ह दिसून आली. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची पोस्ट डिलीट केल्यानंतर कंगना भडकली असून तिने यासंदर्भात एक पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये आपण इथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकेल, असं वाटतं नसल्याचं म्हटलंय.
कंगनानं स्वतःच इन्स्टाग्रामच्या स्टोरीतून याबद्दलची माहिती दिलीये. कंगना इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये म्हणते, इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे. यात मी कोरोनाला संपवण्याची धमकी दिली होती. यामुळे कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्यात. म्हणजेच दहशतवादी आणि कम्युनिस्ट लोकांबद्दल सहानुभूती असलेल्यांबद्दल ऐकलं होतं. मात्र, कोरोनाचा फॅन क्लब! विशेष आहे! इन्स्टावर मला दोनच दिवस झालेत. मात्र इथे मी एका आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असं वाटत नाहीये.
शनिवारी कंगनानं एक पोस्ट शेअर करत तिला कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलं होतं. या पोस्टमध्ये कंगनाने जर तुम्ही घाबरला तर तो तुम्हाला घाबरवेल. चला या कोरोनाला संपवू. हा कोरोना काहीच नाही, केवळ एक साधा ताप आहे, असं लिहिलं होतं.
ADVERTISEMENT