Japanese girls Viral holi video : देशभरात नुकताच होळी सण (Holi Festivel) उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र दिल्लीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने या होळीच्या रंगाचा बेरंग केला आहे. त्याच झालं अस आहे की, होळीनिमित्त रंग लावण्याच्या बहाण्याने काही तरूणांनी जापनीज तरूणीसोबत (Japanese girl molested) अश्लील कृ्त्य केल्याची निंदनीय घटना घडलीय.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral video) झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक महिलांनी ही लैंगिक छळाची घटना असल्याचे सांगत संबंधित तरूणांवर कारवाईची मागणी केली आहे. (japanese girl molested by boys during holi video viral on socil media delhi pahadganj)
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत (Viral video) एक तरूण जापनीज तरूणीला (Japanese girl) वाईटरित्या स्पर्श करून तिच्या गालावर रंग लावत आहे. त्यानंतर तिच्या मागून एक तरूण येत तिच्या डोक्यावर अंड फोडतोय. त्यानंतर आणखीण एक तरूण तिच्या जवळ येऊन तिला पकडतो. तसेच अंडा फोडणारा तरूण नंतर तिच्यावर स्प्रे मारतो. तसेच अनेक तरूण तिा रंग लावण्याच्या बहाण्याने वाईटरित्या स्पर्श करत आहेत. तरूणी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तरूणांनी तिला कसून पकडले आहे. हा संपुर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे. जापनीच तरूणीने स्वत: हा व्हिडिओ शेअर केला होता, त्यानंतर तो डिलीट केला. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करून संताप व्यक्त केला होता.चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..
चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..
या घटनेनंतर अनेकांनी व्हिडिओ शेअर करून घटनेची निंदा केली आहे. देशात दोन भारत आहेत. ही माणसे खरोखरच कलंक आहेत, आणि भारतीय समाजातही यांचे समर्थक आहेत, अशी टीका कॉग्रेस नेत्या पंखुडी पाठक (Pankhuri Pathak) यांनी केली आहे. हे पाहण किती भयानक आहे. मला समजंत नाही आहे, आई-वडिल मुलांना काय संस्कार देतात? ही घृणास्पद वागणूक आहे, अशी टीका एंटी रेप अॅक्टिव्हिस्ट योगिता भयाना यांनी केली आहे. नेटकऱ्यांनी देखील या घटनेचा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
सोशल मीडियावर (Social media) या व्हिडिओची माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील पहाडगंज येथील असल्याची माहिती मिळत आहे. जापानच्या दूतावासाशी संपर्क करण्यात आला असून तरूणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) ठाण्यात याप्रकरणी अद्याप कोणतीच तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संबंधितांवर गु्न्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान आता या प्रकरणात तरूणांवर कारवाई होते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?
ADVERTISEMENT