‘साप चावल्याप्रमाणे…’, जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीसांवर पहिला ‘वार’

मुंबई तक

23 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:23 AM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनामुळे जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. दरम्यान, निलंबनानंतर जयंत पाटलांनी विधिमंडळाबाहेरून पहिला हल्ला थेट शिंदे फडणवीसांवर केलाय. जयंत पाटलांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागलीये. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून गुरूवारी विधानसभेत प्रचंड राडा झाला. […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनामुळे जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. दरम्यान, निलंबनानंतर जयंत पाटलांनी विधिमंडळाबाहेरून पहिला हल्ला थेट शिंदे फडणवीसांवर केलाय. जयंत पाटलांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागलीये.

हे वाचलं का?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून गुरूवारी विधानसभेत प्रचंड राडा झाला. या गदारोळात जयंत पाटलांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यावर बोट ठेवत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली आणि तसा ठराव मंजूर करून हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबन करण्यात आलं.

निलंबनाच्या कारवाईनंतर जयंत पाटील सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले असून, आज (23 डिसेंबर) पहिला वार जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद… जयंत पाटलांची टीका

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटलांनी ट्विट केलं आहे. जयंत पाटलांनी म्हटलं आहे की, ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या विधानसभेत ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत,’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Nana Patole : “फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंविरुद्ध याचिका दाखल केली होती”

शिंदे-फडणवीसांवर दिल्लीतून दबाव? जयंत पाटील काय म्हणाले?

‘मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये’, असं म्हणत जयंत पाटलांनी दिल्लीतील मोदी सरकारमुळे शिंदे-फडणवीस सरकार मौन धरून असल्याचा आरोप केलाय.

Jayant Patil : ‘ज्या’ शब्दामुळे बाहेर जावं लागलं तोच शब्द पुन्हा वापरत केलं ट्विट, म्हणाले…

‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा. कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकांतील भाजपचा विजय हा शिंदे फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे,’ असं म्हणत कर्नाटक भाजप विधानसभा निवडणुकीच्या उद्देशाने हा मुद्दा छेडत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp