42 किलोचा खंडा दाताने उचलला; खंडेरायाच्या जेजुरीतील असा रंगला ‘तलवारबाजी’ सोहळा

मुंबई तक

• 01:45 AM • 17 Oct 2021

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा सोहळा रद्द झाला असला, तरी पारंपरिक तलवारबाजीची स्पर्धा पार पडली. स्थानिक भाविकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. जेजुरीत मर्दानी दसरा उत्साहात साजरा केला जातो. खंडा तलवारीचे मर्दानी खेळ खेळून झाल्यावर या सोहळ्याची सांगता होते. अडीचशे वर्षांपूर्वी 42 किलोंची खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी खंडेरायाचरणी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा सोहळा रद्द झाला असला, तरी पारंपरिक तलवारबाजीची स्पर्धा पार पडली. स्थानिक भाविकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

जेजुरीत मर्दानी दसरा उत्साहात साजरा केला जातो. खंडा तलवारीचे मर्दानी खेळ खेळून झाल्यावर या सोहळ्याची सांगता होते. अडीचशे वर्षांपूर्वी 42 किलोंची खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी खंडेरायाचरणी अर्पण केलेली आहे.

तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी गडावर परतल्यानंतर खंडा तलवार उचलली जाते. या मर्दानी दसऱ्याच्या खेळातून भक्त खंडोबारायाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात.

या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे खंड्याचे मर्दानी खेळ. यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक दिवस भाविक, स्पर्धक तयारी करत असतात. अगदी 12 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे स्पर्धक खंडा तलवार उचलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात.

तब्बल 42 किलोंची खंडा तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातानं उचलून धरण्याची स्पर्धा रंगते. ही स्पर्धा आज सकाळी पार पडली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी नसली, तरी स्थानिकांच्या उपस्थितीत हा तलवारबाजीचा सोहळा रंगला.

    follow whatsapp