उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात २६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर २८ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. या अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.
ADVERTISEMENT
चंद्रिका देवीचं दर्शन घेऊन परतत होते भाविक, त्याचवेळी अपघात
नवरात्रीनिमित्त उन्नावच्या चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सगळे भाविक कोरथा गावात परतत होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
५० भाविक चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते
उत्तर प्रदेशातील ५० भाविक उन्नाव या ठिकाणी चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. हे सगळे भाविक दर्शन घेऊन परतत असताना वेगात असलेला ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. या ठिकाणी सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांनी या भीषण अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत केली जाणार आहे. कानपूर ट्रॅक्टर अपघाताच्या बातमीने अतीव दुःख झाले. ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं म्हणत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रूपये तर जखमींना ५० हजार रूपये दिले जातील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर आणखी जीव वाचू शकले असते असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT