बंगळुरु: मुलींनी हिजाब घालण्यावरून कर्नाटकात प्रचंड वाद सुरू झाला आहे. या वादातून विद्यार्थ्यांमध्ये दगडफेकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही लोक, जे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्याऱ्या मुलींना विरोध करत आहेत. भगवी शाल परिधान केलेले काही लोकं हे एकाकी मुलीला घेरुन तिच्यासमोर जोरजोरात ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आहेत. तर दुसरीकडे मुलगीही प्रत्युत्तर म्हणून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत असल्याचं दिसून आलं. हाच व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये काही लोक हिजाब घातलेल्या मुलीभोवती धार्मिक घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. मुलीने सांगितले की, तिला घेरलेल्या लोकांमध्ये महाविद्यालयीन लोकांव्यतिरिक्त बाहेरील लोकांचाही समावेश होता.
पाकिस्तानातून प्रतिक्रिया
भारतीय पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी शेअर केलेल्या घटनेचा व्हिडिओ रिट्विट करत पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी लिहिले की, ‘मार्टिन ल्यूथर किंग एकदा म्हणाले होते – द्वेषाचा अंत द्वेषाने केला जाऊ शकत नाही, द्वेष केवळ प्रेमाने संपविलं जाऊ शकतं’. हे दृश्य पहा.. कट्टरतावादी हिंदूंच्या जमावाकडून एका एकट्या मुस्लिम मुलीचा छळ केला जात आहे. एकट्या मुलींना घेरून द्वेष वाढवू नका.’
या व्हिडिओवर पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी घेरलेले असूनही ती घाबरत नाही, या मुलीच्या धाडसाचे लोकही कौतुक करत आहेत.
जीशान सईद नावाच्या युजरने लिहिले की, ‘भारतातील प्रत्येक मुस्लिम महिलेने विशेषतः यावेळी बुरखा घालायला हवा.’
सईद नय्यर उद्दीन नावाच्या युजरने लिहिले की, ‘धर्मांध लोकांसमोर उभ्या असलेल्या या धाडसी आणि निडर एकाकी मुलीला माझा सलाम. ही मुलगी मुस्लिमविरोधी भाजप आणि आरएसएसच्या विरोधात लोकांना एकत्र करेल अशी आशा आहे.’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना टॅग करत मुझामिल नावाच्या युजरने लिहिले, ‘सर पाहा.. भारतातील मुस्लिमांसोबत काय झाले’
रशीद खलील नावाच्या युजरने लिहिले की, ‘हे जनावर आहेत.’ शाहिद अक्रम नावाच्या युजरने लिहिले की, ‘हे भारताचे तालिबान आहेत.’
अब्दुल समद नावाच्या युजरने लिहिले, ‘तुझ्यात खूप ताकदीची मुलगी आहे… आणि या फॅसिस्ट जमावाला लाज वाटली पाहिजे.’
काय आहे हा संपूर्ण वाद?
जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात 6 विद्यार्थिनी महाविद्यालय प्रशासनाच्या नियमांविरुद्ध हिजाब घालून महाविद्यालयात आल्या होत्या. यानंतर कर्नाटकातील इतर महाविद्यालयांमध्येही हिजाब घालण्यावरून वाद निर्माण झाला होता.
हिजाबच्या निषेधार्थ काही विद्यार्थी भगवी शाल घेऊन शाळा-कॉलेजमध्ये येऊ लागले. त्यामुळे प्रकरण अधिकच तापले. मंगळवारी हिजाबच्या वादावरून कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांचे समर्थक आणि भगवी शाल परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
कर्नाटक: हिजाबवरुन तुफान राडेबाजी, तीन दिवस शाळा-कॉलेज बंद
हिजाबचा वाद पाहता राज्य सरकारने कर्नाटकातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश अनिवार्य केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालता येईल का, याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता वाढता वाद पाहता कर्नाटक सरकारने सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT