ADVERTISEMENT
भारतरत्न लता मंगेशकर या आज (28 सप्टेंबर) आपला 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याचनिमित्ताने त्यांच्या काही जुन्या आठवणींना देऊयात उजाळा.
लता मंगेशकर यांनी आजवर हजारो अजरामर गाणी सिनेसृष्टीला दिली आहेत. त्यांचे जादुई स्वर आजही रसिकांचं मनाला भुरळं घालतं.
लता दीदींच्या भगिनी मीनाताई यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की, ‘मी त्यांची बहिण म्हणून कौतुक करत नाही. पण त्यांचासारखा कलाकार दुसरा कोणीही नाही.’
आजही लता मंगेशकर या दिवसातील अनेक तास रियाज करतात. पण पूर्वीप्रमाणे तानपुरा घेऊन रियाज करणं त्यांना शक्य होत नाही. मात्र असं असलं तरी त्या रियाज विसरलेल्या नाहीत.
लता दीदी या वयात देखील स्वत: जेवण बनवून सर्वांना आवडीने खाऊ घालतात अशीही आठवण मीनाताईंनी सांगितली आहे.
लता मंगेशकर या वाढत्या वयामुळे सार्वजनिक कार्यक्रमात आता फारशा दिसत नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या बऱ्याच सक्रीय असतात. अनेकदा त्या स्वत: ट्विट देखील करतात.लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाने आजवर अवघ्या विश्वाला वेड लावलं आहे. त्यामुळेच त्यांना ‘गानकोकिळा’ असं संबोधलं जातं
लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाने आजवर अवघ्या विश्वाला वेड लावलं आहे. त्यामुळेच त्यांना ‘गानकोकिळा’ असं संबोधलं जातं
लता दीदींना 92 व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबई तक’कडून मनपूर्वक शुभेच्छा!
ADVERTISEMENT