महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ५७ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आला आहे. महाराष्ट्रात ३ एप्रिलला म्हणजेच शनिवारी ४ लाख ६२ हजार लोकांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरणाचे टप्पे सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी संख्या आहे. आता येत्या काही दिवसात लसीकरणाचं लक्ष्य दररोज सहा लाख लसींपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य महाराष्ट्र सरकारने ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव
शनिवारी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ६२ हजार ७३५ जणांचं लसीकरण करण्यात आलं. आत्तापर्यंत ही सर्वात मोठी संख्या आहे. देशभरात लसीकरण सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात २ एप्रिलपर्यंत ७३ लाख ४७ हजार ४२९ लोकांना लस देण्यात आली आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात लसीकरण सुरू झाल्यापासून ही सर्वात मोठी संख्या आहे.
३ एप्रिलला ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. राज्यभरातल्या ४ हजार १०२ व्हॅक्सिन सेंटर्सवरून या लसी देण्यात आल्या. खरंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत तरीही पुण्यात ७६ हजार ५९४ लोकांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईत ४६ हजार ९३७ लोकांना लस देण्यात आली आहे. नागपुरात ४१ हजार ५५६ लोकांना लस देण्यात आली. ठाण्यात ३३ हजार ४९० लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण करण्यात या चार जिल्ह्यांनी वेग घेतला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
CM ठाकरेंचा फडणवीस आणि राज ठाकरेंना फोन, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री
घरोघरी जाऊन रूग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठीची संमती राज्याने केंद्राकडे मागितली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा राज्याला आहे. महाराष्ट्राला येत्या काळात २५ कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. आमची ही मागणी असली तरीही आम्ही केंद्राकडून उशीर झाला तरीही त्यांना दोष देणार नाही कारण त्यांना सगळ्या राज्यांचा विचार करायचा आहे हे आम्हाला ठाऊक आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT