महाराष्ट्रात दिवसभरात 43 हजार 320 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 51 लाख 82 हजार 592 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 92.51 टक्के झाला आहे. तर दिवसभरात 22 हजार 122 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 361 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा1.59 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 2 हजार 19 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज घडीला 27 लाख 29 हजार 301 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 24 हजार 932 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात 3 लाख 27 हजार 580 सक्रिय रूग्ण आहेत.
आज राज्या 22122 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 5602019 इतकी झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या 361 मृत्यूंपैकी 275 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 86 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आळा आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 231 ने वाढली आहे.
ADVERTISEMENT