Maharashtra HSC Results : कोकण विभागाने मारली बाजी, औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी!

मुंबई तक

• 11:36 AM • 03 Aug 2021

सुप्रीम कोर्टाने बारावीचे निकाल लावण्याची ठरवून दिलेली 31 जुलैची मुदत उलटल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. मात्र 2 ऑगस्टला जाहीर करण्यात आलं की निकाल आज म्हणजेच 3 ऑगस्टला लागणार आहेत. संध्याकाळी चारपासून हे निकाल वेबसाईटवर पाहता येऊ लागले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के […]

Mumbaitak
follow google news

सुप्रीम कोर्टाने बारावीचे निकाल लावण्याची ठरवून दिलेली 31 जुलैची मुदत उलटल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. मात्र 2 ऑगस्टला जाहीर करण्यात आलं की निकाल आज म्हणजेच 3 ऑगस्टला लागणार आहेत. संध्याकाळी चारपासून हे निकाल वेबसाईटवर पाहता येऊ लागले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने विभागवार निकालात बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. पाहुयात विभागवार निकाल कसा आहे.

हे वाचलं का?

HSC Result 2021: विभागानुसार निकाल

पुणे – 99.75

नागपूर – 99.62

औरंगाबाद – 99.34

मुंबई – 99.79

कोल्हापूर – 99.67

अमरावती – 99.37

नाशिक – 99.61

लातूर – 99.65

कोकण – 99.81

राज्यातील 9 विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल 91.81 टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. तर औरंगाबादचा निकाल 99.34 टक्के इतका लागला आहे. कोकणातील एकूण 27 हजार 384 विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यात आलं असून त्यामध्ये 13 हजार 887 मुलं तर 13 हजार 497 समावेश आहे. यापैकी 13 हजार 854 मुलं आणि 13 हजार 478 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

2021 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)

कला (Arts) – 99.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

वाणिज्य (Commerce) – 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

विज्ञान (Science) – 99.45 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 98.80 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते

कोरोना संकटामुळे यंदा बारावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणी सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन या पद्धतीनुसार लावण्याचा निर्णय झाला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात बारावीचा निकाल लागला.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

    follow whatsapp