बंडखोरांची पहिली पसंती ‘भाजप’; फुटीचा जास्त फटका काँग्रेसला, काय सांगतो ADIचा रिपोर्ट?

मुंबई तक

• 01:09 PM • 22 Jun 2022

आधी कर्नाटक, नंतर मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र. आमदारांच्या बंडखोरीचा खेळ महाराष्ट्रातही सुरू झाला आहे. शिवसेनेचे आमदार आणि उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची तलवार उपसली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झाले तेच महाराष्ट्रात झाले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही सरकारही […]

Mumbaitak
follow google news

आधी कर्नाटक, नंतर मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्र. आमदारांच्या बंडखोरीचा खेळ महाराष्ट्रातही सुरू झाला आहे. शिवसेनेचे आमदार आणि उद्धव सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाची तलवार उपसली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झाले तेच महाराष्ट्रात झाले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचेही सरकारही पडेल.

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे आता 287 आमदार आहेत. सरकार बनवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारकडे 153 आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 उमेदवार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा करत आहेत. या बंडखोर आमदारांनी भाजपची कास धरल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल हे जवळपास निश्चित आहे.

बंडखोर आमदारांची पहिली पसंती भाजप राहिली आहे. 5 वर्षात 405 आमदारांनी पक्ष सोडल्याची आकडेवारी सांगते. यापैकी 45 टक्के आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ची आहे. यामध्ये 2016 ते 2020 या पाच वर्षात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात दाखल झालेल्या आमदारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा एडीआर अहवाल गेल्या वर्षी मार्चमध्ये समोर आला होता.

बंडखोरीचा सर्वाधिक फायदा भाजपला

मार्च 2021 च्या ADR अहवालात असे म्हटले आहे की 2016 ते 2020 दरम्यान देशभरातील विधानसभेतील 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. त्यापैकी 182 म्हणजेच 45 टक्के आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. अहवालानुसार, पक्ष सोडून गेलेल्या 38 म्हणजे 9.4% आमदार काँग्रेसशी संबंधित होते. तर, 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये आणि 16 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये 16, जेडीयूमध्ये 14, बसपा आणि टीडीपीमध्ये प्रत्येकी 11 आमदार सामील झाले आहेत.

बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या 170 आमदारांनी पक्ष सोडला, तर भाजपचे 18 आमदार होते. बसपा आणि टीडीपीच्या 17-17 आमदारांनी पक्ष सोडला होता. त्याचवेळी शिवसेनेचा 5 वर्षात असा एकही आमदार नव्हता, ज्याने आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

पक्ष सोडला, पण यशाचा दर किती?

– तसं पाहिलं तर आमदार पक्ष सोडण्याचे काम निवडणुकीपुर्वी किंवा निवडणूक झाल्यावर करत असतात. परंतु अलिकडच्या काळात मध्येत पक्ष सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, आमदार राजीनामा देतात आणि नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि त्याच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवतात.

पण आमदार आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचा यशाचा दर किती आहे? म्हणजे त्यापैकी किती जिंकले?

ADR नुसार, 2016 ते 2020 दरम्यान, 357 आमदार होते ज्यांनी एकाच वेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त 170 म्हणजेच 48 टक्के आमदार जिंकले आहेत. तर दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवणारे 48 आमदार होते आणि त्यात 39 म्हणजे 81 टक्के विजयी झाले होते.

आकडे बघितले तर समजते की, त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यावर पोटनिवडणूक लढवून विजयी झालेल्या आमदारांच्या यशाचे प्रमाण खूप जास्त आहे. तर विधानसभा निवडणूक लढवलेल्या बंडखोर आमदारांच्या यशाचे प्रमाण कमी आहे.

किती खासदारांनी ठोकला पक्षाला रामराम?

आमदारांनी पक्ष सोडल्याची चर्चा केली, आता खासदारां विषयी चर्चा करू. 5 वर्षात 12 लोकसभा आणि 16 राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला आहे. भाजपच्या 5 लोकसभा खासदारांनी पक्ष सोडला होता, तर काँग्रेसच्या 7 राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला होता.

लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या बंडखोरीचा फायदा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना झाला आहे. पक्ष सोडून 5 लोकसभा खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तर 10 राज्यसभा खासदार भाजपमध्ये दाखल झाले होते.

    follow whatsapp