मुंबई: भारतात लसीकरणामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या दोन मोठ्या राज्यांमध्ये जोरदार स्पर्धा असल्याचं दिसून येत आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. पण गेल्या 12 दिवसांत उत्तर प्रदेशने याबाबतीत बराच वेग पकडला आहे. सध्या उत्तर प्रदेशात दररोज महाराष्ट्रापेक्षा जास्त लसीकरण होत आहे. यूपीचा हा वेग देशभरातील लसीकरणाच्या आकडेवारीतही वाढ करणारा आहे. गेल्या दोन दिवसांत देशात 45 लाख लस डोस लागू करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
उदाहरणार्थ: महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 2.13 कोटी लस डोस देण्यात आले आहेत. हे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहेत आणि जानेवारी महिन्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यापासून महाराष्ट्र दररोज लसीकरणात सर्वात पुढे असल्याचं दिसून आलं आहे. 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सर्वाधिक 5.4 लाख डोस देण्यात आले होते. परंतु 14 मेनंतर उत्तर प्रदेशात दररोज जास्तीत जास्त डोस देत असल्याचं दिसून आलं आहे.
यूपीमध्ये आतापर्यंत एकूण 1.7 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. हे आकडे कोविन अॅपमधील अधिकृत डेटावर आधारित आहेत. परंतु जर लसीकरणाची आकडेवारी प्रति 10 लाख लोकसंख्येच्या टक्केवारीतून पाहिली तर उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे. यूपीमध्ये दर दहा लोकांमागे 73,500 डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात हाच आकडा संख्या 1.7 लाख एवढा आहे.
महाराष्ट्रात दोन दिवसात घटलं लसीकरणाचं प्रमाण, अवघ्या 1 लाख 27 हजार जणांचं लसीकरण
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या लसीकरणाच्या आकडेवारी एक नजर
– महाराष्ट्रातील एकूण लसीकरण – 2 कोटी 12 लाख
– उत्तर प्रदेशमधील एकूण लसीकरण– 1 कोटी 68 लाख
(एकूण लसीकरणात अद्यापही महाराष्ट्र आघाडीवर)
18 ते 44 वयोगटातील लसीकरण
– महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील 7 लाख लोकांचं लसीकरण आतापर्यंत पूर्ण
– उत्तर प्रदेशमध्ये 18 ते 44 वयोगटातील 13 लाख लोकांचं लसीकरण आतापर्यंत पूर्ण
(म्हणजेच 18 ते 44 वयोगटातील लसीकरणात उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षाही पुढे आहे.)
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी बोलाताना सांगितलं की, ‘सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र पुरेशा प्रमाणात लस दिल्या जात नाहीत. आम्ही सध्या 45+ वरील वयोगटावर लक्ष केंद्रित करीत आहोत. दरम्यान, मुंबई आणि पुणे येथील लसीकरण केंद्रांनी युद्धपातळीवर काम केले आहे.’
यूपीचे अधिकारी काय म्हणतात?
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव (माहिती) नवनीत सहगल यांनी याबाबत असं म्हटलं आहे की, ‘आता राज्यात लसीकरणाची संख्या आणखी वाढू शकेल कारण 18-44 वयोगटातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. सध्या 23 जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. यावेळी, आम्ही सर्वाधिक लोकांना लसीकरण करीत आहोत. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहेत.
18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?
18+ लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला टाकलं मागे
18 ते 44 वयोगटातील लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र यूपीपेक्षा खूप मागे आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे. यूपीमध्ये आतापर्यंत या वयोगटातील 13.61 लाख डोस दिले आहेत. पण महाराष्ट्र याबाबतीत पिछाडीवर आहे. त्यांनी या वयोगटातील फक्त 7.47 लाख लोकांना लस दिल्या आहेत.
दरम्यान, याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘उत्तर प्रदेशला नुकताच लसींचा मोठा पुरवठा करण्यात आला आहे. आम्ही 18-44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर देखील काढलं आहे. पण फायझर आणि मॉडर्ना यांना नुकसान भरपाईच्या नियमांमध्ये अडचण आहे. तसंच राज्यं आणि खासगी रुग्णालयांमध्येही देण्यात येणाऱ्या लसींच्या किंमतीबाबत देखील भेदभाव करण्यात आला आहे. आता राज्य सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे कारण, लस उत्पादक प्रथम खासगी रुग्णालयांना लस पोहोचवत आहेत.’
४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श
दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील अधिकारी विनीत सहगल म्हणाले की, ‘यूपीमध्ये लसीकरणांची संख्या वाढत आहे कारण खेड्यांमधील संकोच दूर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार खूप प्रयत्न करत आहे. आमच्याकडे 97 हजार गावांमध्ये सर्विलांस कमेटी आहेत. ज्या लसीकरण व चाचणीच्या टेस्टिंगच्या मोहीत राबवीत आहेत. आम्ही ‘माझं गाव कोरोना मुक्त’ नावाची सार्वजनिक मोहीम देखील चालविली आहे. याअंतर्गत कोरोनामुक्त होणाऱ्या गावांसाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या मोहिमेमध्ये लसीकरणाचा देखील समावेश आहे. यूपीच्या 68 टक्के गावांमध्ये कोरोनाचे एकही अॅक्टिवर रुग्ण आढळलेला नाही.’
ADVERTISEMENT