महाराष्ट्रातली दुकानं आणि आस्थापना यांच्या पाट्या मराठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून दुकानदारांनी सरकारवर टीका करत असं करण्यास नकार दिला आहे. अशात राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड किल्ल्याची नावं दिली आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ही नवी नावं बंगल्यांना दिली आहेत. मंत्रालयासमोरच्या मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थांना गड-किल्ल्यांची नावं देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली होती. ज्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालखी मार्गाच्या विकासासाठी आम्ही केंद्र सरकारसोबत- उद्धव ठाकरे
मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू नावाने ओळखला जाणार आहे. तर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड नाव देण्यात आलंय. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय.
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?
अ-3-शिवगड-जितेंद्र आव्हाड
अ-4-राजगड-दादा भुसे
अ-5-प्रतापगड-के.सी. पाडवी
अ-6-रायगड-आदित्य ठाकरे
बी-1-सिंहगड-विजय वडेट्टीवार
बी-2-रत्नसिंधू-उदय सामंत
बी-3-जंजिरा-अमित देशमुख
बी-4-पावनगड-वर्षा गायकवाड
बी-5-विजयदुर्ग-हसन मुश्रीफ
बी-6-सिद्धगड-यशोमती ठाकूर
बी-7-पन्हाळगड-सुनील केदार
क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील
क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे
क 3 – पुरंदर
क 4 – शिवालय
क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब
क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील
क 7 – जयगड
क 8 – विशाळगड
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आदेशानंतर हे बंगले आता या नव्या नावांनी ओळखले जाणार आहेत.
ADVERTISEMENT