मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी

मुंबई तक

• 09:10 AM • 17 Nov 2021

– प्रवीण ठाकरे, मालेगाव प्रतिनिधी त्रिपुरात झालेल्या मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणी मालेगावात बंद पुकारलेल्या रझा अकादमीच्या संघटनेच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्री छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी झाडाझडती घेत काही महत्वाची पत्रक आणि दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. रझा अकॅडमीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात नवीन बसस्थानक परिसरात जुना आग्रा रोड वर दगडफेक जाळपोळ सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची […]

Mumbaitak
follow google news

– प्रवीण ठाकरे, मालेगाव प्रतिनिधी

हे वाचलं का?

त्रिपुरात झालेल्या मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणी मालेगावात बंद पुकारलेल्या रझा अकादमीच्या संघटनेच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्री छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी झाडाझडती घेत काही महत्वाची पत्रक आणि दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.

रझा अकॅडमीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात नवीन बसस्थानक परिसरात जुना आग्रा रोड वर दगडफेक जाळपोळ सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची नासधूस करण्याचे प्रकार घडले होते. पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस कर्मचारी व तीन सामाजिक कार्यकर्ते गंभीररित्या जखमी झाले होते.

मालेगाव बंदला लागलेले हिंसक वळण तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल भाजप नेते अशिष शेलार यांनी भेट देत तिथे बैठक झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मालेगावी पोलिसांनी रझा अकादमीच्या लले चौकातील कार्यालयावर रात्री छापा मारून पंचसमक्ष कार्यालयाचे कुलूप जबाबदार पदाधिकारी न आल्याने तोडण्यात घेऊन झडती सत्र राबवले गेले. पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांना काही पत्रके संगणक व दस्तऐवज मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी धार्मिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पत्रकारांशी वार्तालाप करताना केला होता. मात्र पोलिसांनी काल रात्री थेट रझा अकॅडमीच्या कार्यालयावर छापा मारत आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. मालेगाव दंगल सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान , प्राणघातक हल्ले,जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या संबंधी दाखल गुन्ह्यात पुरावे तपासून पोलिसांतर्फे अटकेची कारवाई केली जात आहे.

कुणावरही आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे. रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत केलेली कारवाई कुठलाही दबाव नसल्याचे संकेत देणारी ठरली आहे.

अमरावती हिंसाचार : चिथावणी देणाऱ्या 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती; वाचा काय आहे पोस्टमध्ये?

    follow whatsapp