संपत्तीच्या वादातून दिराने भावजयीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे भावजयीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला आहे. ही घटना टिटवाळा नजीक उंभारणी गावात घडली असून आरोपी दिराला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे (वय ४० वर्षे) असे मृतक भावजयीचं नाव आहे.
Mumbai Crime : दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी करणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी केली अटक
कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंभारणी गावातील पाण्याच्या टाकीजवळ ६ फेबुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यातच या महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याची कुजबुज परिसरातील नागरिकांमध्ये सुरु झाल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी खोलात जाऊन चौकशीला सुरुवात केली. यानंतर शवविच्छेदन अहवालात गाळ आवळून खून झाल्याचे समोर आल्यामुळे यात घातपात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.
Crime: तांत्रिकाने महिलेला सांगितलं, तुझा नवरा माझ्या अंगात येतो आणि मग…
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यावेळी मृतक महिलेची बहीण आशा वाघे हिच्याकडून पोलिसांना माहिती मिळावी की, मृत धृपदा व तिचा दिर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्यात जमीनीच्या आणि पैशांच्या करणावरून वाद सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी दिर सुरेशला ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता त्याने जागा-जमीनचे पैशाचे वादातून त्याच्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला काल सायंकाळी अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे करीत आहेत.
अमरावती : जन्मदात्या पित्याची मुलाने दगडाने ठेचून केली हत्या
ADVERTISEMENT