पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून पुण्यातल्या एका व्यापाऱ्याला 52 लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचं पथक जेव्हा मांत्रिकाला अटक करण्यासाठी पोहचलं तेव्हा मांत्रिकाच्या घरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी एकत्र करून ठेवलेला लाखो रूपयांच्या बनावाट नोटा पोलिसांना सापडल्या. व्यावसायिकाने ही रक्कम कर्ज काढून मांत्रिकाला भरली होती. त्यातून या मांत्रिकाने स्वतःचं कर्ज फेडलं.
ADVERTISEMENT
काय घडला प्रकार?
हा सगळा प्रकार धायरी येथील गणेशनगर भागात घडला. या परिसरात वास्तव्य करणाऱ्या चाळीस वर्षीय व्यावसायिकाला एका भामट्याने लुबाडलं. किसन पवार असं या मांत्रिकाचं नाव आहे. या मांत्रिकाने व्यावसायिकाला सातत्याने पैशांचा पाऊस पाडण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी त्याने अनेक प्रकारचे अघोरी विधी करण्याचा दावा केला. हे विधी केल्यानंतर आकाशातून पैशांचा पाऊस पडेल अस किसन पवार या मांत्रिकाने व्यावसायिकाला सांगितलं. अंधश्रद्धेपोटी व्यावसायिकाने किसन पवारवर विश्वास ठेवला आणि पैसे देण्यास सुरूवात केली.
किसन पवार हा व्यावसिकाकडे सारखे सारखे पैसे मागू लागला. प्रत्येकवेळी वेगवेगळे विधी करण्यासाठी पैसे लागत असल्याचंही त्याने सांगितलं. पैशांचा पाऊस पडल्यानंतर हे सर्व वसूल होतील आणि आपण श्रीमंत होऊ या आशेपोटी व्यावसायिकाने सढळ हाताने पैसे देण्यास सुरूवात केली. ही रक्कम 52 लाख रूपयांच्या घरात गेल्यानंतर व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर या व्यावसायिकाने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
किसनचा कारनामा पुरेपूर ओळखलेल्या पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. किसन जालन्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडे एका व्यक्तीला अडचण असल्याचं सांगून पाठवण्यात आलं. या व्यक्तीकरवी किसनने व्यावसायिकाा देखील फसवल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT