ADVERTISEMENT
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत बनला आहे. आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले मैदानात उतरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाचा इशारा दिला.
कोल्हापुरातून याची सुरूवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मराठा मूक आंदोलन होत आहे.
संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नांदेड शहरात मूक आंदोलन झालं.
या आंदोलनाला प्रंचंड जनसमुदाय जमला होता.
कोरोना काळात मेळावे, राजकीय आंदोलनांना प्रतिबंध केलेला असून, गर्दी गोळा करण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मराठा मूक मोर्चात कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा मूक मोर्चा प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
‘समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत’, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?’, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT