Actor Ambar Kothare Death: प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारेंच्या वडिलांचं निधन

मुंबई तक

• 08:54 AM • 21 Jan 2023

Amber Kothare Pass away: मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (Amber Kothare) यांचं वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी आज (21 जानेवारी) त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या जाण्याने अभिनेते महेश कोठारेंना (Mahesh Kothare) पितृशोक झाला आहे. अंबर कोठारे त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश […]

Mumbaitak
follow google news

Amber Kothare Pass away: मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (Amber Kothare) यांचं वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी आज (21 जानेवारी) त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या जाण्याने अभिनेते महेश कोठारेंना (Mahesh Kothare) पितृशोक झाला आहे. अंबर कोठारे त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, सून निलिमा कोठारे, नातू आदिनाथ कोठारे, नातसून उर्मिला कोठारे असा संपूर्ण परिवार आहे. (Marathi Actor and film maker Mahesh kothare’s Father Ambar Kothare Passes Away)

हे वाचलं का?

अंबर कोठारे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रंगकर्मी अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागाला, वेगवेगळी कामं करावी लागली. दिवाळीच्या सणात ते रस्त्यावर उटणं विकण्याचंही काम करायचे. मात्र परिस्थितीसमोर ते डगमगले नाही किंवा मागेही हटले नाहीत.

Mumbai Tak Exclusive : तांबेंनी विश्वासघात केला, धोका दिला : पटोलेंचे आरोप

अंबर कोठारे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘ब्रिटिश बँक ऑफ दि मिडल इस्ट’या बॅंकेत नोकरी केली. जवळजवळ, 40 वर्ष त्यांनी बँकेत वेगवेगळ्या पदांवर कामं केली. अंबर कोठारे नोकरीबरोबरच त्यांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्वही जपायचे. ते नोकरीही करायचे आणि रंगभूमीची आवडदेखील जोपासायचे. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. अभिनयाच्या जोरावर त्यांनी सर्व काही मिळवलं होतं.

अंबर कोठारे यांनी बरीचशी नाटके रंगभूमीवर सादर केली. याचबरोबर त्यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. ते ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (INT) संस्थेच्या मराठी विभागाचे पहिले सचिव होते. अंबर कोठारे यांनी सादर केलेल्या प्रमुख नाटकांपैकी एक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. तसंच, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता.‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे हे आज ज्या स्थानावर आहेत, त्यांच्या यशामागे अंबर कोठारे यांचे मोलाचा वाटा आहे. महेश कोठारेंना बालकलाकार असल्यापासून ते निर्माता-दिग्दर्शक होईपर्यंत वडिलांचे कुठे ना कुठे मार्गदर्शन लाभले आहे. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट जबरदस्त हीट झाला होता. तो सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे अंबर कोठारेंच्या निधनाने कोठारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp