महाराष्ट्रातली दुकानं आणि आस्थापना यावरचे फलक हे मराठीतच असले पाहिजेत यासंदर्भातल्या कायद्यात राज्य सरकारने सुधारणा केली आहे. दुकानांच्या पाट्या आता मराठीतच असल्या पाहिजेत अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयाला आता दुकानदारांनी विरोध दर्शवला आहे. नव्या नियमाचं पालन करून मराठी पाटी लावणार नाही अशी भूमिकाच काही दुकानदारांनी आता घेतली आहे.
ADVERTISEMENT
मराठी पाट्या लावण्याचा निर्णय झाल्यापासून मनसे आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहून मराठी भाषेत पाट्या करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच हे श्रेय महाराष्ट्र सैनिकांचं आहे असंही त्यांनी म्हटलं. अशात आता दुकानदारांनीच या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
‘दुकानांवरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी सरकारने खर्च द्यावा, मी उभं राहून..’ -इम्तियाज जलील
दुकानदारांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन झाल्यापासून आम्हाला नुकसान झालं आहे. लॉकडाऊनमध्ये जे नुकसान झालंय त्यातून आम्ही अजून सावरलेलो नाही. अशात मराठी फलक लावण्याचा खर्च उचलायचा हे आम्हाला परवडणारं नाही. त्यामुळे आम्ही मराठी फलक लावणार नाही असं उघडपणे दुकानदार सांगत आहेत.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे वीरेन शाह यांनी म्हटलं आहे की मी आता माझ्या स्टोअरचं नाव मराठीत लिहिलं आहे. 2020 पासून लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आम्ही विक्रेते अजूनही त्रस्त आहोत. अशात किरकोळ विक्रेत्यांवर खर्चाचा बोजा टाकणं योग्य नाही. आम्ही अद्याप महाराष्ट्र सरकारने दिलेली सूचना वाचलेली नाही. फॉन्टच्या आकाराचा मुद्दा होता मात्र आता सरकारने काय म्हटलं आहे ते बघावं लागेल. मात्र आम्हाला आता अतिरिक्त खर्च परवडणार नाही. 2001 पासून या संदर्भातलं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. बॉम्बे हायकोर्टाने या संदर्भात आम्हाला जेव्हा सरकारने नियम केले तेव्हा दिलासा दिला आहे.
दुकानांच्या पाट्या आता मराठीतच! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
शाह पुढे म्हणाले, ‘आम्ही मराठी भाषेच्या विरुद्ध नाही. आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषेचा आदर करतो. पण प्रत्येक क्षेत्राचे वेगळेपण असते. महाराष्ट्रीयनांचे प्राबल्य असलेल्या दादर परिसरात दुकानातील फलकांवर मराठीचे मोठे फॉन्ट आहेत. तर मोहम्मद अली रोडसारख्या भागातील दुकानांमध्ये उर्दूचे मोठे फॉन्ट आहेत.’
मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, पाट्या बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा असा प्रश्न विचारला आहे.
राज्यात मराठी पाट्यांचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेत आणण्याचं काम मनसेने केलं. राज ठाकरेंच्या खळ्ळ खट्याक भूमिकेमुळे मुंबईम मनसे सैनिकांनी अनेक दुकानांच्या काचा फोडल्या होत्या. राज्य सरकारने मराठी पाट्यांसंदर्भात नियमांमध्ये बदल केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचं कौतुक करत मराठी पाट्यांचं श्रेय हे मनसेलाच मिळायला हवं असं ठणकावून सांगितलं होतं.
ADVERTISEMENT