प्रसिद्ध मराठमोळी गायिका वैशाली माडे हिने आपल्या आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. तर आता वैशाली आता राजकारणात उतरणार आहे. गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 31 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वैशाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.
ADVERTISEMENT
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या पार्श्वगायकांमध्ये वैशालीचं नाव येतं. 2008 मध्ये वैशाली माडे ‘झी मराठी’च्या मराठी ‘सारेगमप’शोची विजेती ठरली होती. त्यानंतर वैशालीने झीटीव्हीच्या हिंदी ‘सारेगमप’ शोमध्येही भाग घेतला होता. शिवाय हिंदीच्या शोमध्येही तिने आपली छाप पाडली आणि ती विजेती ठरली होती.
वैशाली ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं वैशालीने गायलं असून लोकांनीही या गाण्याला भररभरून प्रतिसाद दिला. त्याचसोबत ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘पिंगा’ या गाण्यालाही वैशालीचा आवाज आहे.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिजनमध्ये वैशालीने भाग घेतला होता. बिग बॉसनंतरही वैशाली फार चर्चेत आली होती. आपल्या आवाजाने वैशालीने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. तर आता राजकारणात वैशाली कसं काम करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT