Defamtion Suit Filed by Medha Kirit Somaiya : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आज बॉम्बे हायकोर्टात १०० दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. माध्यमांसमोर केलेलं वक्तव्य बदनामी करणारं असल्याचं मेधा सोमय्यांनी सांगितलं आहे. शिवडी मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा सोमय्यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात जे आरोप केले होते ते फेटाळले आहेत.
सामना वृत्तपत्राच्या पुढच्या अंकात अंकात संजय राऊत यांनी माफी मागावी आणि या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला बदनामीकारक मजकूर, फोटो हे सगळं मागे घेण्यात यावं अशीही मागणी मेधा सोमय्या यांनी कोर्टाला केलेल्या अर्जात केली आहे. जी माफी मागितली जाईल ती ठळक आणि वृत्तपत्राच्या दर्शनी भागात असावी असंही मेधा सोमय्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एप्रिल महिन्यात एक आरोप केला होता. ज्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे असा आरोप केला होता. हा घोटाळा १०० कोटींचा आहे असाही दावा त्यांनी केला होता. विक्रांत घोटाळ्यापासून टॉयलेटपर्यंत यांनी घोटाळे केले आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते त्यात किरीट सोमय्या त्यांची पत्नी आणि कुटुंबीय आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याच आरोपांच्या विरोधात किरीट सोमय्यांच्या पत्नी आणि मुलगा पोलीस ठाण्यातही गेले होते. आता त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात थेट मानहानीचा १०० कोटींचा दावा केला आहे.
मेधा यांनी याचिकेत म्हटले आहे की, “राऊत यांनी सत्याचा विचार न करता आणि प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने आणि चुकीचा फायदा मिळवण्याच्या उद्देशाने केवळ काही सनसनाटीपणा करण्यासाठी आरोप केले आहेत . मी डॉक्टरेट केलं आहे. तसंच प्राध्यापिका म्हणून माझ्या पेशामध्ये मला प्रतिष्ठा आहे. मात्र संजय राऊत यांनी जी वक्तव्यं केली आहेत, त्यामुळे समाजात, सामान्य लोकांच्या नजरेत आणि हितचिंतकाच्या नजरेत माझं स्थान कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच मी हा दावा करते आहे.
ADVERTISEMENT