पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीबद्दल (Mehul Choksi) एक मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोक्सी हा डोमिनिकामध्ये सापडला आहे. तेथील पोलिसांनी त्याला अटक केली असून आता अँटिगा पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोक्सी अँटिगामधून अचानक गायब झाला होता. असे म्हटलं जात आहे की, आपला बचाव करण्यासाठी तो अँटिगामधून पळून गेला होता. परंतु आता डोमिनिका पोलिसांनी त्याला पकडलं असून लवकरच त्याला अँटिगा पोलिसांच्या स्वाधीन केले जाऊ शकते.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने सीबीआयला कळविले आहे की, मेहुल चोक्सी डोमिनिका येथे सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितले की, तो अँटिगा आणि बार्बुडा येथून बोटीने डोमिनिकाला आला होता.
दरम्यान, इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले, ‘आम्ही डोमिनिकन सरकारला त्यांच्या देशात अवैध प्रवेश केल्याप्रकरणी चौक्सीला अटक करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन त्याला थेट भारताकडे सोपवता येईल.’
Nirav Modi ला झटका, लंडन कोर्टाने दिली प्रत्यार्पणाला मंजुरी
मेहुल चोक्सी रविवारी म्हणजेच 23 मे रोजी अँटिगा येथून फरार होता. अँटिगा येथील त्याच्या घरातून तो गाडी घेऊन बाहेर पडत असल्याचं शेवटचं पाहायला मिळालं होतं. त्या वेळी असा अंदाज व्यक्त केला जात होता की, मेहुल अँटिगा सोडून क्यूबाला जाऊ शकतो. कारण तेथे त्याचे एक अलिशान घर आहे. पण आता तो डोमिनिकामध्ये असल्याची माहिती मिळाली आणि तिथल्या पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं.
तथापि, अँटिगामधून मेहुल ज्या पद्धतीने फरार झाला होता ते पाहत कोणालाही फारसं आश्चर्य वाटलं नाही. कारण, भारत सरकारकडून मेहुलच्या अँटिगामधील नागरिकत्व रद्द करण्याची सतत मागणी होत होती. अशा परिस्थितीत तेथील अधिकाऱ्यांवर दबाव येत होता आणि मेहुललाही स्वत:विषयी काळजी होती. अशा परिस्थितीत त्याला वाटले की आपण हा देश सोडून दुसऱ्या देशात जाणं हा एक उत्तम पर्याय आहे.
Nirav Modi च्या प्रत्यार्पणाला U.K. च्या गृहमंत्र्यांनी दिली संमती, सीबीआयची माहिती
भारताच्या बाजूने प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरूच राहतील
मेहुल चौक्सी सध्या डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे, पण लवकरच त्याला अँटिगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल असा अंदाज आहे. तथापि, डोमिनिका पोलिसांनी मेहुलला अटक करणे ही भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.
कारण अँटिगा प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, जर मेहुल चोक्सी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि तो सापडू शकला नाही तर प्रत्यार्पण प्रकरणी त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया कदाचित बारगळू शकते. पण आता मेहुल हा डोमिनिकामध्ये सापडला आहे, त्यामुळे त्याला थेट भारतात आणण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तसंच त्याचं अँटिगामधील नागरिकत्व रद्द करण्याची मागणी देखील सतत केली जात आहे.
प्रत्येक वेळी पळून जाण्यात मेहुल चौक्सी का होतो यशस्वी?
असे म्हटले जात आहे की, अँटिगामधून पळून जाण्यात मेहुल यशस्वी झाला कारण त्याने एकाच वेळी अनेक कॅरिबियन देशांचे नागरिकत्व घेतले आहे. या कारणास्तव, तो प्रत्येक वेळी पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी देखील होतो. मेहुल चौक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कडून तब्बल 13,500 कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपी आहेत.
ADVERTISEMENT