MHT CET 2021 : PCM ग्रुपसाठीची Admit Cards आली, कसं मिळवाल कार्ड?

मुंबई तक

• 04:21 PM • 15 Sep 2021

PCM इंजिनिअरींग प्रोग्राम्ससाठी 21 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने PCM इंजिनीअरिंग प्रोग्राम्ससाठी अॅडमिट कार्ड्स उपलब्ध केली आहेत. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर ही अॅडमिट कार्ड्स MHT CET 2021उपलब्ध करण्यात आली आहेत. नोंदणी केलेले उमेदवार BE/BTech प्रोग्राम्ससाठीची MHT CET […]

Mumbaitak
follow google news

PCM इंजिनिअरींग प्रोग्राम्ससाठी 21 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हे वाचलं का?

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने PCM इंजिनीअरिंग प्रोग्राम्ससाठी अॅडमिट कार्ड्स उपलब्ध केली आहेत. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर ही अॅडमिट कार्ड्स MHT CET 2021उपलब्ध करण्यात आली आहेत. नोंदणी केलेले उमेदवार BE/BTech प्रोग्राम्ससाठीची MHT CET अॅडमिट कार्ड्स या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करून घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि अन्य लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून या वेबसाइटवर लॉगिन करावं लागणार आहे.

MHT CET hall ticket 2021 हॉल तिकिटावर परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचं ठिकाण, उमेदवाराची वैयक्तिक माहिती, महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना आदी माहिती असणार आहे. MHT CET hall ticket 2021 कसं पाहायचं किंवा डाउनलोड करायचं, याबद्दलची माहिती अशी आहे-

काय आहेत टप्पे?

cetcell.mahacet.org ही MHT CET Cell ची अधिकृत वेबसाइट आहे. केवळ त्याच वेबसाइटवर अॅडमिट कार्ड उपलब्ध आहेत.

वेबसाइटचं होमपेज उघडल्यानंतर PCM Group साठीच्या MHT CET अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करावं.

त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकावा.

ही सगळी योग्य माहिती भरल्यानंतर PCM Group साठीचं MHT CET परीक्षेचं अॅडमिट कार्ड वेबसाइटवर दिसू लागेल.

पाचवा टप्पा – स्क्रीनवर दिसत असलेलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.

हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने ते हॉल तिकीट बारकाईने वाचावं. त्यावर दिलेलं आपलं नाव, जन्मतारीख, फोटो आदी माहिती योग्य आहे ना, याची खात्री करून घ्यावी. त्यात काही चूक असल्यास उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती MHT CET Cell ला दिली पाहिजे.

MHT CET परीक्षा BE आणि BTech कोर्सेसना अॅडमिशन घेण्यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा दोन ग्रुप्ससाठी असते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा पीसीबी ग्रुप आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हा पीसीएम ग्रुप.

या परीक्षेत प्रत्येकी 100 मार्क्सचे तीन पेपर्स असतात. महाराष्ट्र बोर्डाच्या 11वी आणि 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांच्या सिलॅबसवर आधारित प्रश्न या पेपर्समध्ये विचारले जातात. प्रश्नांमध्ये 11वीच्या सिलॅबसला 20 टक्के वेटेज असतं, तर 12वीच्या सिलॅबसवर आधारित प्रश्न 80 टक्के असतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग अर्थात मार्क कमी करण्याची पद्धत या परीक्षेत अवलंबली जात नाही.

    follow whatsapp